• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळ | विट्यात झालं असं काही, नागरिकांची उडाली भंबेरी..! प्रशासनाचीही धावाधाव..?

Admin by Admin
September 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
खळबळ | विट्यात झालं असं काही, नागरिकांची उडाली भंबेरी..! प्रशासनाचीही धावाधाव..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा (सांगली) : खबऱ्या प्रतिनिधी / विटा शहरात आज, सोमवारी दुपारी दोन वाजता अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने शहर हादरले.

या अचानक घडलेल्या प्रकाराने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, वीज पडल्याचा अंदाज करीत नागरिकांनी शिवाजी चौकात मोठी गर्दी केली.

आज, दुपारी अचानक मोठा आवाज झाला. त्यावेळी शहरातील मुख्य शिवाजी चौकापासून लांबपर्यंत विजेसारखा लखलखता प्रकाश पडला. त्यामुळे वीज पडल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. परंतु, हा आवाज इतका मोठा होता की, अनेक दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या आवाजामुळे काही सेकंद भूकंपासारखी जमीन हादरली.

शहरात सोमवारी आठवडा बाजार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होती. दुपारी दोन वाजता अचानक वीज पडल्यासारखा आवाज झाल्याने नागरिक चांगलेच भयभीत होऊन मिळेल त्या दिशेने धावू लागले. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनाही स्फोटासारखा आवाज झाला; परंतु कशामुळे आवाज झाला याची माहिती अद्याप नसल्याचे सांगितले.

दरम्यान, विटा शहरातील शिवाजी चौकात इमारतीवर असलेल्या मोबाईल टॉवरवर वीज पडली असावी, अशी चर्चा नागरिकांत सुरू होती.

Previous Post

पी एम किसानची ई-केवायसी पूर्ण करा- तहसीलदार डॉ शैलजा पाटील

Next Post

लाचखोर ‘मकानदारने’ जमवली कोट्यवधींची ‘माया’..? सुटली नाही हाव..! ‘आयुक्तांना’ आव्हान देत कलंकित केलं ‘महापालिकेचे’ नाव..??

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

लाचखोर 'मकानदारने' जमवली कोट्यवधींची 'माया'..? सुटली नाही हाव..! 'आयुक्तांना' आव्हान देत कलंकित केलं 'महापालिकेचे' नाव..??

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group