• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लाचखोर ‘मकानदारने’ जमवली कोट्यवधींची ‘माया’..? सुटली नाही हाव..! ‘आयुक्तांना’ आव्हान देत कलंकित केलं ‘महापालिकेचे’ नाव..??

Admin by Admin
September 6, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मकानदारने पूर्ण केलेल्या फाईलिंची चौकशी करून संपत्तीची चौकशी करण्याची नागरिकांतून सोशल मीडियावर मागणी..?

कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / दोन प्लॉटचे एकत्रीकरण व त्यावर बांधकामासाठी परवाना देण्याच्या मोबदल्यात ४५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडील शाखा अभियंत्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.

अल्ताफ मकबूल मकानदार (वय ४४, रा. अल्फोन्सा स्कूलजवळ, मिरज) असे अभियंत्याचे नाव असून, तक्रारदाराची शंका आल्याने मकानदार याने लाच स्विकारली नाही मात्र, मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाने दोन प्लॉटचे एकत्रिकरण व त्यावर बांधकाम परवाना मिळविण्यासाठी महापालिकेच्या कुपवाड येथील कार्यालयाकडे अर्ज केला होता. यावेळी शाखा अभियंता मकानदार याने तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ‘लाचलुचपत’ने केलेल्या पडताळणीत पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले होते.

१० फेब्रुवारी २०२२ रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पुन्हा पडताळणी केली असता, मकानदार याने जुने काम करुन दिल्याच्या मोबदल्यात ४० हजार व चर्चेअंती ३० हजार रुपये लाच मागणी केल्याचे सिध्द झाले होते. मात्र, मकानदार याला तक्रारदाराची शंका आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. लाचेची मागणी केल्याबद्दल मकानदार याच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया उशिरापर्यंत सुरु होती.

अल्ताफ मकानदार यांनी तालुक्यातील एका गावात पॅनेल उभा करून निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळण केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शिवाय, घराची झडती घेतल्यास लाखो रुपये रोख रक्कम, किलो-अर्धा किलो सोनं आणि गोरगरिबांच्या कागदपत्रांच्या फाईली सापडतील अशी सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे. या मागणीचा कितपत विचार प्रशासन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदत्त मोरे, संजय भिलारे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, संजय संकपाळ यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

खळबळ | विट्यात झालं असं काही, नागरिकांची उडाली भंबेरी..! प्रशासनाचीही धावाधाव..?

Next Post

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..? कोण..? कधी..? पहा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..? कोण..? कधी..? पहा सविस्तर..!

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..? कोण..? कधी..? पहा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group