• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आमदार सुरेश खाडे जिल्ह्यातील पहिलं कमळ फुलवणारे नेतृत्व : मंत्रिपदाची वर्णी लागण्यासारखे कर्तृत्व..! ‘राष्ट्रवादीच्या’ बड्या नेत्याला जिल्ह्यातून ‘खाडं’ करण्यासाठी भाजप वरिष्ठांकडून ‘खाडे’ना मंत्रिपद..?

Admin by Admin
August 9, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
आमदार सुरेश खाडे जिल्ह्यातील पहिलं कमळ फुलवणारे नेतृत्व : मंत्रिपदाची वर्णी लागण्यासारखे कर्तृत्व..! ‘राष्ट्रवादीच्या’ बड्या नेत्याला जिल्ह्यातून ‘खाडं’ करण्यासाठी भाजप वरिष्ठांकडून ‘खाडे’ना मंत्रिपद..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ,9 ऑगस्ट : खबऱ्या प्रतिनिधी / महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. आज सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

भाजपकडून आतापर्यंत 9 जणांची नावं समोर आली आहेत. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे. यातले सांगलीचे आमदार सुरेश खाडे यांचं नाव सरप्राईज म्हणून समोर आलं आहे.

कोण आहेत सुरेश खाडे..? जन्मदिनांक :- १ जून १९५८ शिक्षण :- 1) वेल्डिंग डिप्लोमा ( व्हिजीटीआय , मुंबई ) ब्रॉन्झ व सिल्वर मेडल 2) डॉक्टरेट , कोलंबो युनिव्हरसिटी , श्रीलंका व्यवसाय :- उद्योग व शेती आमदार सुरेश खाडे हे 2004 साली जत मधून, 2009 साली मिरज मधून तर 2014 आणि 2019 साली पुन्हा मिरज मधून असे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सुरेश खाडे हे भाजपचे सांगली जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आलेले पहिले आमदार आहेत. त्यापूर्वी त्यांनी १९९९ ला जत राखीव मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. भाजपमध्ये आल्यानंतर सुरेश खाडे हे भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात.

भाजपचा जिल्ह्यातील दलित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठवला आहे. उद्योजक असणाऱ्या सुरेश खाडे यांनी आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षातून केली. त्यांनी १९९९ ला जत या अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून निवडणूक लढवली.

मात्र या निवडणुकीत खाडे पराभूत झाले. कॉंग्रेसचे उमाजी संनमडीकर हे त्यावेळी विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. सुरेश खाडे 2004 साली जत राखीव मतदार संघातून 26,000 मताधिक्यानी विजयी झाले.

त्यांनी कॉंग्रेसचे उमाजी संनमडीकर यांचा पराभव केला आणि खाडे यांनी जिल्ह्यात पहिले कमळ फुलविले. या विजयात जेष्ठ नेते विलासराव जगताप यांचा मोठा हातभार होता.

कोणती पदं भुषवली?

सदस्य अनुसूचित कल्याण समिती , महाराष्ट्र विधानसभा सदस्य अंदाज समिती , महाराष्ट्र विधानसभा सदस्य पंचायत राज समिती , महाराष्ट्र विधानसभा सदस्य उपविधान समिती , महाराष्ट्र विधानसभा संचालक , राहुरी कृषी विद्यापीठ , राहुरी सांगली जिल्हा भाजप , अध्यक्ष ( ग्रामीण )

Previous Post

१ कोटी रुपयांची लाच मागणारा पोलीस गोत्यात : महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ..!

Next Post

स्वराज्य योध्दा प्रतिष्ठानच्या मनोज महाडीक यांनी पंचायत समिती लढवावी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
स्वराज्य योध्दा प्रतिष्ठानच्या मनोज महाडीक यांनी पंचायत समिती लढवावी

स्वराज्य योध्दा प्रतिष्ठानच्या मनोज महाडीक यांनी पंचायत समिती लढवावी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group