• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

१ कोटी रुपयांची लाच मागणारा पोलीस गोत्यात : महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ..!

Admin by Admin
August 6, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Kolhapur ACB Trap | पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात दाखल असलेल्या दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने करुन देतो, असे सांगून पुण्यातील वयस्कर शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल विरुद्ध कोल्हापूर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

जॉन वसंत तिवडे (वय-40 रा. कोरोची. ता. हातकणंगले) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. कोल्हापूर एसीबीने शनिवारी (दि.6) शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडेवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे कोल्हापूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. संशयित जॉन तिवडे याला यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले होते, असेही बुधवंत यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील देहूगाव येथील 70 वर्षीय शेतकऱ्याच्या जमिनीबाबत पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात तीन दावे दाखल आहेत. त्याची सुनावणी सुरु आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये अनोळखी व्यक्तीचा तक्रारदार शेतकऱ्याला फोन आला. तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा किवां संपर्कात रहा, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला संपर्क केला. त्या व्यक्तीने शेतकऱ्याला कोल्हापूर येथील बसस्थानक परिसरात येणास सांगितले.

तक्रारदार शेतकरी 22 मार्च रोजी कोल्हापूर येथे गेले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन संपर्क साधला असता फोन करणारी व्यक्ती पोलीस असल्याचे समजले. त्यानंतर त्याचदिवशी तक्रारादार व पोलीस यांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यावेळी जॉन तिवडे याने आपली ओळख करुन देत आपण पोलीस असल्याचे आणि महसूल खात्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले चांगले संबंध असल्याचे तक्रारदार शेतकऱ्याला सांगितले.

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठ येथे आपल्या जमिनीबाबत तीन दावे दाखल आहेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले ओळखीचे संबंध असल्याने प्रलंबित खटल्याचा निकाल आपल्या बाजून लावून देतो. असे सांगून तुमच्या विरुद्ध असलेल्या पार्टीने एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिल्याचे सांगितले. आपल्या बाजूने निकाल लावण्यासाठी आपण किती देणार अशी विचारणा करुन एक कोटी रुपये मागितले.

तक्रारदार यांनी घरच्यांशी बोलून कळवतो असे सांगून ते तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवांत यांची भेट घेतली.
त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता जॉन तिवडे याने पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी दुपारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Previous Post

मिरज | बिबट्याच्या कातड्याची तस्करी , पोलिसांसमोर करायला गेला कायद्याची मस्करी..? गांधी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!

Next Post

आमदार सुरेश खाडे जिल्ह्यातील पहिलं कमळ फुलवणारे नेतृत्व : मंत्रिपदाची वर्णी लागण्यासारखे कर्तृत्व..! ‘राष्ट्रवादीच्या’ बड्या नेत्याला जिल्ह्यातून ‘खाडं’ करण्यासाठी भाजप वरिष्ठांकडून ‘खाडे’ना मंत्रिपद..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आमदार सुरेश खाडे जिल्ह्यातील पहिलं कमळ फुलवणारे नेतृत्व : मंत्रिपदाची वर्णी लागण्यासारखे कर्तृत्व..! ‘राष्ट्रवादीच्या’ बड्या नेत्याला जिल्ह्यातून ‘खाडं’ करण्यासाठी भाजप वरिष्ठांकडून ‘खाडे’ना मंत्रिपद..?

आमदार सुरेश खाडे जिल्ह्यातील पहिलं कमळ फुलवणारे नेतृत्व : मंत्रिपदाची वर्णी लागण्यासारखे कर्तृत्व..! 'राष्ट्रवादीच्या' बड्या नेत्याला जिल्ह्यातून 'खाडं' करण्यासाठी भाजप वरिष्ठांकडून 'खाडे'ना मंत्रिपद..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group