• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आमदार अनिल बाबर यांच्या पत्‍नी शोभा बाबर यांचे निधन

Admin by Admin
August 3, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
आमदार अनिल बाबर यांच्या पत्‍नी शोभा बाबर यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा : खबऱ्या प्रतिनिधी; खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर तथा काकी यांचे आज (वय ६२) निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत होता.

प्रारंभी त्यांना विटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्‍यांना पुणे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

सौ. शोभा बाबर यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्‍याने त्‍यांच्यावर विट्यात एका खासगी रूग्‍णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्‍याना दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती प्रारंभी स्थिर होती. परंतु त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होता. आमदार अनिल बाबर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत. मुलगा अमोल आणि सुहास आणि स्वतः आमदार अनिल बाबर हेदेखील पत्नीच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवून होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार बाबर यांची थेट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. दरम्यान शोभा बाबर यांच्या निधनाने संपूर्ण खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर आणि माजी नगरसेवक अमोल बाबर ही दोन मुले असा परिवार आहे.

शोभा बाबर यांचे माहेर सातारा जिल्ह्यात…

शोभा बाबर यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९६० साली सातारा जिल्ह्यातील आर्वी (ता. कोरेगाव) येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रय बंडोबा जाधव-पाटील, हे आर्वी गावचे पोलीस पाटील होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. आमदार बाबर यांचे लग्न ते गार्डी (ता.खानापूर) चे सरपंच असताना २० मे १९७६ साली झाले.

Previous Post

जिभेवर रेंगाळणारी चव आता कुपवाड मध्ये… अनलिमिटेड जेवण, अगदी माफक दरात..!

Next Post

मिरज | बिबट्याच्या कातड्याची तस्करी , पोलिसांसमोर करायला गेला कायद्याची मस्करी..? गांधी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | बिबट्याच्या कातड्याची तस्करी , पोलिसांसमोर करायला गेला कायद्याची मस्करी..? गांधी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!

मिरज | बिबट्याच्या कातड्याची तस्करी , पोलिसांसमोर करायला गेला कायद्याची मस्करी..? गांधी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group