कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / कुपवाड शहरात पाण्याच्या टाकीजवळ धोंडिकाका कॉम्प्लेक्स मध्ये आज न्यू मॅनेजमेंट ने सेवा देणारे उत्कृष्ठ चवीचं ‘हॉटेल धोंडिकाका ‘ चे उदघाटन करण्यात आले.

हॉटेल व्यवसायात अग्रेसर असलेल्या संदीप दादा तुपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शाकाहारी – मांसाहारी जेवणाचा आस्वाद आता कुपवाड करांना घेता येणार आहे. मालवणी , कोल्हापुरी, गावरान अश्या तडका जेवणाची चवं जिभेवर रेंगाळणार आहे.


याप्रसंगी हॉटेल चालक राकेश (कृष्णा) चौगुले , तेजस माने, पोपट चौगुले, युवराज नंदिवाले, अनिल नंदिवाले, मच्छिन्द्र वनखडे, बाळासाहेब नंदिवाले यांच्यासहित ग्राहक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.



