• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिवंत नागाची पूजा करून व्हिडीओ सोशल मीडियावर..? मिरज तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल..

Admin by Admin
August 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिवंत नागाची पूजा करून व्हिडीओ सोशल मीडियावर..? मिरज तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी : जिवंत नाग पकडून त्याची पूजा केल्या प्रकरणी सलगरेमध्ये एका विरुद्ध तर तीन नाग पकडून एका खोलीत ठेवल्याप्रकरणी शिराळ्यात दोघांविरुद्ध वनविभागाने कारवाई केली.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बसाप्पा किसान माळी (रा. सलगरे, ता. मिरज), विशाल अशोक पवार (वय 29, रा. कुरळप, ता. शिराळा) आणि एक अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे.

याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की, सलगरे येथे जिवंत नागाची पूजा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याची पडताळणी करण्यासाठी वनविभागाचे पथक सलगरे येथे गेले असता बसाप्पा माळी याने दि. 31 जुलै रोजी सलगरे येथील महादेव मंदिराशेजारी असणार्‍या विहिरीजवळील नाग पकडून तो रात्रभर मंदिरात ठेवला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी त्याला बाहेर काढून त्याचे प्रदर्शन करून, खेळवून त्याची पूजा केली होती. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल पवार आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांनी तीन जिवंत नाग पकडून शिराळ्यातील परीट मळा येथे असणार्‍या एका शेतातील बंद असलेल्या घरात लपवून ठेवले होते. याबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर सांगली उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, इस्लामपूर वनपाल प्रकाश पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पवार व अल्पवयीन मुलाला अटक करून संबंधित तीन नाग वनविभागाने ताब्यात घेतले आहेत.

Previous Post

Sangli | खुनप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपीचे पलायन

Next Post

जिभेवर रेंगाळणारी चव आता कुपवाड मध्ये… अनलिमिटेड जेवण, अगदी माफक दरात..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिभेवर रेंगाळणारी चव आता कुपवाड मध्ये… अनलिमिटेड जेवण, अगदी माफक दरात..!

जिभेवर रेंगाळणारी चव आता कुपवाड मध्ये... अनलिमिटेड जेवण, अगदी माफक दरात..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group