Sunday, June 8, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या एसपींकडून पोलिसांवर कौतुकाची थाप

तासगावातील बालकाच्या अपहरण प्रकरणात उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशंसा : पोलीस दलाची प्रतिमा उंचावल्याची भावना

Admin by Admin
July 27, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
सांगलीच्या एसपींकडून पोलिसांवर कौतुकाची थाप

 

तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी / तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या चिमुरड्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. त्याच हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करणाऱ्या स्वाती माने हिने हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले होते. याप्रकरणात पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे तपास केला. संशयित माने यांना गजाआड करीत मायलेकरांची अवघ्या आठ तासात भेट घालून दिली. ही कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कौतुकाची थाप टाकली आहे. सर्वांचा आज पोलीस मुख्यालयात सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावल्याची भावना यावेळी गेडाम यांनी व्यक्त केली.

तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये चिंचणी (ता. तासगाव) येथील एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तर याच हॉस्पिटलमध्ये स्वाती माने ही महिला परिचारिका म्हणून कामावर रुजू झाली होती. चिंचणी येथील ‘त्या’ महिलेचे सीझर करण्यात आले. तिला मुलगा झाला. मात्र परिचारिका म्हणून काम करणाऱ्या माने यांनी एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण केले. या प्रकाराने जिल्हाभरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस दल ऍक्शन मोडवर आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कोणत्याही परिस्थितीत अपहरण करणाऱ्या महिलेसह ‘त्या’ नवजात बालकाला सुखरूप शोधून काढण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तासगाव, विटा येथील पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी झपाटून कामाला लागले. सगळे खबऱ्या, गुप्तचर यंत्रणा कामाला लावली. अखेर आठ तासांच्या थरारानंतर ‘त्या’ महिलेला बालकासह पकडण्यात आले.

या आठ तासात पोलिसांनी अक्षरशः जीवाचे रान केले. मायलेकरांची भेट घडवून आणण्यासाठी दिवसभर पोटात अन्नाचा कणही नसताना पायाला भिंगरी बांधून पोलिसांनी हा आव्हानात्मक तपास पूर्ण केला. पोलिसांच्या या अद्वितीय कामगिरीनंतर अखंड पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या कामगिरीनंतर पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनीही ही कामगिरी करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज मुख्यालयात बोलावून सत्कार केला. सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. यापुढेही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

मोटारसायकल चोरी प्रकरणी चिपरीच्या एकास अटक..

Next Post

Sangli | खुनप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपीचे पलायन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sangli | खुनप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपीचे पलायन

Sangli | खुनप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपीचे पलायन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014