• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विटा पोलिसांनी केल्या दोन गुन्हेगारांकडून चार मोटरसायकली जप्त

Admin by Admin
July 27, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
विटा पोलिसांनी केल्या दोन गुन्हेगारांकडून चार मोटरसायकली जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा; खबऱ्या प्रतिनिधी: विटा पोलिसांच्या कारवाईत आज मंगळवारी दोन सराईत मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच आटपाडी पोलिस ठाण्यातील दोन आणि जेजुरी व विटा पोलिस ठाण्याकडील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आणला आहे.

याबाबत विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेली माहिती अशी की, यावर्षी 22 मे रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान समाधान शामराव कारंडे (रा. करांडेवाडी फाटा, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांची हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एम एच 45 ए.के.3015) ही शुक्राचार्य देवस्थान जवळील ताडाचीवाडी (ता. खानापूर) गावच्या हद्दीतील पार्किंगमधून चोरीला गेली होती. याबाबत विटा पोलिस ठाण्यामध्ये 23 मेरोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम नागराळे हे करीत होते.

दरम्यान, 24 जुलैरोजी खानापूर पोलिस चौकीचे पोलिस संतोष घाडगे आणि महेश खिलारी हे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण शिवाजी ऐवळे (वय 22, रा. ताडाचीवाडी, ता. खानापूर) आणि प्रशांत अरुण पवार (वय 23, रा. ताडाचीवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) हे दोघे संशयास्पदरित्या सापडले. त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे ताडाचीवाडी येथील चोरीला गेलेली मोटरसायकल मिळून आली. तसेच या संशयितांना न्यायालयाकडून पोलिस कोठडी मिळवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी खरसुंडी, आवळाई यात्रा, जेजुरी येथून आणखी तीन मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांवर मिळून विटा, जेजुरी आणि आटपाडी येथील पोलिस ठाण्यांमध्ये एकूण चार गुन्हे दाखल आहेत. या चार गुन्ह्यातील एकूण 1 लाख 85 हजार रुपये किमतीच्या 4 मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous Post

घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या नेर्लेच्या तिघांना तीन वर्षांचा सश्रम कारावास

Next Post

मोटारसायकल चोरी प्रकरणी चिपरीच्या एकास अटक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोटारसायकल चोरी प्रकरणी चिपरीच्या एकास अटक..

मोटारसायकल चोरी प्रकरणी चिपरीच्या एकास अटक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group