• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत भाजपच्या वतीने शासकीय रुग्णालयात ब्लॅंकेट वाटप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

Admin by Admin
July 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मिरजेत भाजपच्या वतीने शासकीय रुग्णालयात ब्लॅंकेट वाटप
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी मिरज खबऱ्या

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिरज शहर भाजपाच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयात रुग्णांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस मोहन वनखंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासह शासकीय रुग्णालयात सेवा सुविधा देण्यात येणार असल्याचेही यावेळी वनखंडे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी भाजपाच्या वतीने राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. मिरज शहर भाजपाच्या वतीनेही सामाजिक बांधिलकीतून शासकीय रुग्णालयात मदत देण्यात आली. आमदार सुरेश खाडे, मोहन वनखंडे यांनी रुग्णांसाठी मोफत ब्लॅंकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला. भाजपा अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रुग्णांना थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेटची आवश्यकता होती. भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णांसाठी मोफत ब्लॅंकेट उपलब्ध करून दिल्याने शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी मोहन वनखंडे म्हणाले, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. आज फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करत असताना गोरगरिबांचे हित भाजप कार्यकर्त्यांनी जोपासण्याचा निर्णय घेतला आहे. आज शासकीय रुग्णालयात मोफत ब्लॅंकेट वाटप केले आहेत. यापुढेही आमदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिरज शासकीय रुग्णालयाला साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे वनखंडे म्हणाले. यावेळी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, नगरसेवक पांडुरंग कोरे, राजेंद्र नातू यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मिरज तालुक्यात पुन्हा सावकारी फोफावली : व्याजबट्टा प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा

Next Post

घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या नेर्लेच्या तिघांना तीन वर्षांचा सश्रम कारावास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या नेर्लेच्या तिघांना तीन वर्षांचा सश्रम कारावास

घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या नेर्लेच्या तिघांना तीन वर्षांचा सश्रम कारावास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group