• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज तालुक्यात पुन्हा सावकारी फोफावली : व्याजबट्टा प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा

Admin by Admin
July 15, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज तालुक्यात पुन्हा सावकारी फोफावली : व्याजबट्टा प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : शिंदेवाडी (ता. मिरज) येथील शेतकर्‍याला तिघा सावकारांनी व्याजाने दिलेल्या आठ लाख रुपयांच्या बदल्यात 16 लाख रुपयांची वसुली केली.

तसेच अजून मूळ मुद्दल येणेबाकी असल्याचे सांगून जमीन नावावर करून देण्यासाठी शेतकरी कुटुंबाला धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी शेतकरी नारायण अंकुश पाटील (वय 28, रा. विजापूर रोड, करलमळा, शिंदेवाडी) यांनी तिघाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद आहे.

रोहित राजेंद्र शिंदे (रा. आरग), युवराज श्रीकांत पाटील (रा. अथणी) आणि संदीप सुबराव पाटील (रा. शिंदेवाडी) असे संशयित सावकारांची नावे आहेत.

नारायण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावकारांकडून वेळावेळी व्याजाने पैसे घेतले होते. सावकार रोहित शिंदे यांच्याकडून सात टक्के व्याजाने तीन लाख 20 हजार, युवराज पाटील याच्याकडून 10 ते 15 टक्के व्याजाने एक लाख 80 हजार रुपये आणि संदीप पाटील याच्याकडून सात टक्के व्याजाने तीन लाख रुपये घेतले होते. या बदल्यात शिंदे याला सात लाख रुपये, युवराज पाटील याला सहा लाख 95 हजार रुपये आणि संदीप पाटील याला एक लाख 98 हजार रुपये व्याजासह परत केले होते. तरीही नारायण पाटील यांनी घेतलेल्या व्याजाचे पैशांतील मूळ मुद्दल येणेबाकी असल्याचे सांगत तिघा सावकारांनी वसुलीसाठी तागादा लावला होता.

पाटील यांच्या शिंदेवाडी गावातील घरात येऊन संपूर्ण कुटुंबियांना शिवीगाळ केली. तसेच पैशांच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी धमकी देण्यात आली. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

Previous Post

मिरजेला मिळालेला निधी कोणत्या भोकात गेला..?

Next Post

मिरजेत भाजपच्या वतीने शासकीय रुग्णालयात ब्लॅंकेट वाटप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत भाजपच्या वतीने शासकीय रुग्णालयात ब्लॅंकेट वाटप

मिरजेत भाजपच्या वतीने शासकीय रुग्णालयात ब्लॅंकेट वाटप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group