• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

म्हैसाळ हत्या प्रकरण : मांत्रिक अब्बास बागवानच्या घरावर सांगली पोलिसांचा छापा : काळ्या जादूचे साहित्य हस्तगत: मांत्रिक अघोरी प्रकार करताना ‘हे’ करायचा!

Admin by Admin
July 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे दिल्ली कनेक्शन.? समोर आली धक्कादायक माहिती : सविस्तर वाचा पोलिसांनी काय केलं आवाहन..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी: म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येत अटक असलेल्या मांत्रिक अब्बास बागवान याच्या घराची झडती सांगली पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर घेतली.

सोलापुरातील मुस्लिम पाच्छा पेठ येथील अपार्टमेंटमधील त्याच्या घरी काळ्या जादूचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत केले असून तपासासाठी सांगली येथे घेऊन गेले आहेत.

गुप्तधनाचे आमिष दाखवून म्हैसाळ (सांगली-मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील 9 जणांची हत्या केली. याप्रकरणी अब्बास बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवसे यांच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच दोघा संशयीत आरोपींना 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अब्बास बागवान अघोरी विद्येत होता पारंगत..

अब्बास महंमदअली बागवान हा अघोरी विद्यात पारंगत होता. ही अघोरी विद्या यशस्वी होण्यासाठी तो अघोरी कृत्ये करत असल्याची माहिती त्याच्या घराशेजारी असलेल्या नागरिकांनी दिली. दर अमावस्या, पौर्णिमेला अब्बास बागवान अघोरी कृत्ये करत होता. याबाबत त्याच्या घरातील इतर सदस्यांना देखील माहिती होती. तसेच सोलापुरातील त्याच्या नातेवाईकांनादेखील अघोरी कृत्यांबद्दल माहिती होती.

सोलापुरातही गुप्तधनाचे आमिष..

गुप्तधन काढून देतो, कोट्यवधी रुपयांचे गुप्तधन तुमच्या घराच्या जमिनीखाली आहे. त्यासाठी मंत्रतंत्र विद्येच्या सहाय्याने ते काढावे लागेल असे आमिष दाखवुन त्याने सोलापुरातील नागरिकांना फसविले आहे. यापैकी काही घटनांची पोलीस ठाण्यात नोंद आहे. 2009 साली सोलापुर शहरातील विजापूरवेस येथील एका प्रसिद्ध व्यवसायिकाला फसविले. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे जेलरोड पोलीस ठाण्यात त्याविरोधात नोंद आहेत. पण अनेकवेळा पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्ततादेखील झाली आहे.

काळी जादू करण्याचे साहित्य पोलिसांकडून जप्त…

सांगली पोलिसांची टीम शुक्रवारी दिवसभर सोलापुरात तळ ठोकून त्याच्या घराची झडती घेतली. मुळेगाव रोड वरील सरवदे नगर येथील घर, बाशा पेठ येथील अपार्टमेंट येथील फ्लॅट या घरांची झडती घेण्यात आली. त्याठिकाणी पोलिसांना काळी जादू करण्याचे साहित्य, जडीबुटी सारखे अनेक औषध वनस्पती, लाकडी दांडके आदी साहित्य सांगली पोलिसांनी हस्तगत केले आहे. अटक झाल्यापासून त्याची पत्नी व मुले फरार आहेत. अब्बास बागवान हा काही मोजक्या लोकांच्या संपर्कात होता. शुक्रवारी सांगली पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर हे आपल्या टीम सोबत सोलापुरात आले होते. रात्री उशिरापर्यंत मांत्रिक अब्बास बागवान याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले. आणि सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाणे येथे माहिती देऊन रात्रीच सांगलीच्या दिशेने अब्बासला घेऊन रवाना झाले.

Previous Post

मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार

Next Post

म्हैसाळ हत्याकांड ! धक्कादायक माहिती समोर – बाटलीतून काळ्यारंगाचे दिले विष : आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.? महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम नुसार कलम वाढवले : भामट्या मांत्रिकाकडून हे केले जप्त :

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
म्हैसाळ हत्याकांड ! धक्कादायक माहिती समोर – बाटलीतून काळ्यारंगाचे दिले विष : आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.? महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम नुसार कलम वाढवले : भामट्या मांत्रिकाकडून हे केले जप्त :

म्हैसाळ हत्याकांड ! धक्कादायक माहिती समोर - बाटलीतून काळ्यारंगाचे दिले विष : आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.? महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम नुसार कलम वाढवले : भामट्या मांत्रिकाकडून हे केले जप्त :

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group