• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

म्हैसाळ हत्याकांड ! धक्कादायक माहिती समोर – बाटलीतून काळ्यारंगाचे दिले विष : आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.? महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम नुसार कलम वाढवले : भामट्या मांत्रिकाकडून हे केले जप्त :

Admin by Admin
July 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
म्हैसाळ हत्याकांड ! धक्कादायक माहिती समोर – बाटलीतून काळ्यारंगाचे दिले विष : आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.? महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम नुसार कलम वाढवले : भामट्या मांत्रिकाकडून हे केले जप्त :
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी :
म्हैसाळ (ता. मिरज) येथील पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या दोघा सख्ख्या भावांच्या कुटुंबीयातील तब्बल नऊ जणांनी विषप्राशन करून सामूहिक आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर जिल्हा हादरुन गेला होता. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून वनमोरे कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. मात्र, ही आत्महत्या नसून हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र, आता पोलीस तपासात हे हत्याकांड कर्मकांडातून झाल्याचे पुरावे समोर आल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम कलम ३ नुसार अधिकचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिकात्मक चित्र

ते म्हणाले, खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून म्हैसाळ येथील पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमो दोघा सख्ख्या भावांच्या कुटुंबीयातील तब्बल नऊ जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली होती. घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या दोन चिठ्ठ्यात वनमोरे बंधूंनी त्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या २५ खासगी सावकारांची नावे लिहिली होती. पोलिसांनी सर्व २५ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन यापैकी १९ जणांना अटक केली आहे. उर्वरित फरारी आरोपींच्या चौकशीसाठी पथके रवाना केली होती. मात्र, पोलीस तपासात हे हत्याकांड असल्याचे समोर आले होते. आता पोलीस तपासात हे अंधश्रद्धा कर्मकांडातून झाले असल्याचेही समोर आले आहे.

मांत्रिकाच्या घरातून ‘हे ‘ केले जप्त …

कुख्यात मांत्रिकाने अंधश्रद्धा पसरवत वनमोरे यांना चांगलेच लुबाडल्याची माहिती मिळत आहे. संशयित मांत्रिक अब्बास बागवान याच्या घरी काळ्या रंगाचा डोळ्याचा नारळ,धागा बांधलेला नारळ, कवड्याची माळ, २ चिठया आणि त्याचे झेरॉक्स, वनमोरे यांच्या नावाचे कोरे चेक, असे साहित्य सापडले आहे. तर वनमोरे यांच्या घरी घटनास्थळी सुद्धा नारळ सापडले आहेत. घटना घडली त्या दिवशी मांत्रिक हा त्याचा साथीदार धीरज सुरवसे याच्यासोबत वनमोरे याच्या घरी आला व त्यांनी वनमोरे कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर विधी करण्यासाठी ११००(अकराशे) गहू प्रत्येकाला ७ वेळा गच्चीत जाऊन मोजण्यास सांगितले. दरम्यान, ९ बाटल्यांमध्ये विष ठेऊन प्रत्येकाला बोलावून बाटलीतील द्रव पिण्यास सांगितले. शेजारच्या खोलीत जाऊन शांत झोपण्यास सांगितले.

मांत्रिक आणि वनमोरे कुटुंबीयांचा चार वर्षांपासून होता संपर्क.

मांत्रिकाने गुप्तधन शोधून देतो म्हणून गेल्या चार वर्षांपासून वेळोवेळी पैसे घेतले आहेत. हे पैसे वनमोरे कुटुंबाने विविध सावकारांकडून तसेच इतर ठिकाणी हातउसने घेऊन मांत्रिकाला पैसे दिले असल्याचे समोर आले आहे. ते पैसे द्यायला लागू नयेत, म्हणून हा गुन्हा घडला असल्याचे तपासात समोर आले आहे.

घडना घडण्यापूर्वीच लिहिल्या होत्या सुसाईड नोट…

घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या दोन चिठ्ठ्यात वनमोरे बंधूंनी त्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या २५ खासगी सावकारांची नावे लिहिली होती. पोलिसांनी सर्व २५ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन यापैकी १९ जणांना अटक केली आहे. पण ही सुसाईड नोट घटना घडण्यापूर्वीच लिहिल्या असल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या घरात सुसाईड नोटच्या झेरॉक्स सापडल्या आहेत.

या प्रकरणातील सावकारी गुन्हा दाखल झालेला म्हैसाळ गावचा पोलिस पाटील याला अचानक कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला आता डॉक्टरांनी बेड रेस्ट घेण्यास सांगितली आहे. परंतु, पोलीस पाटील हा गावात खुलेआम मोकाटपणे फिरत असून त्याच्यासोबत याच गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना अटक कधी होणार.? याबाबत नागरिकांत चर्चा सुरू आहे.

Previous Post

म्हैसाळ हत्या प्रकरण : मांत्रिक अब्बास बागवानच्या घरावर सांगली पोलिसांचा छापा : काळ्या जादूचे साहित्य हस्तगत: मांत्रिक अघोरी प्रकार करताना ‘हे’ करायचा!

Next Post

नव्या ‘सरकार राज’ मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘जुन्या यादीला’ खो; तूर्त वेट ऍन्ड वॉच..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

नव्या 'सरकार राज' मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या 'जुन्या यादीला' खो; तूर्त वेट ऍन्ड वॉच..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group