मुंबई: गोपनीय खबऱ्या महा मिडीया : मनसे अध्यक्ष आणि शिवसेनेतील बंड केलेले नेते एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती गोपनीय खबऱ्याला लागली आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना काल रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

खबऱ्याच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन राज ठाकरे यांच्या तब्येतीची आणि राज्यातील राजकीय परिस्थिती संबंधी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन सध्याच्या राजकारणा संदर्भात बोलले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, सध्या एकनाथ शिंदे यांना वेगळा गट स्थापन करायचा आहे, त्यामुळे ही फोनवरील चर्चा राजकीय वर्तुळात महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान,शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जर शिंदे गट विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेमध्येही हा गट सामील होऊ शकतो. विलीनीकरणासाठी शिंदे मनसेकडे प्रमुख पर्याय म्हणून बघत असल्याचे सांगण्यात येत आहेत. यामागे कारण सांगण्यात येत आहे की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सागितलं आहे की, ते हिंदुत्वासाठी वेगळे होते आहेत. त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. यातच अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

