• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मालगावमधील सामाजिक कार्यकर्त्याचा अपघातादरम्यान मृत्यू…

Admin by Admin
June 26, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील मालगाव येथे झालेल्या मोटरसायकल अपघातात सामाजिक कार्यकर्ते शितल बाबासो जत्ते (वय ४७) हे जागीच ठार झाले. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मालगाव लक्ष्मीनगर येथे नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिम बाजूस हा अपघात झाला. याबाबत मयत शितल यांचे भाऊ संतोष चारुदत्त जत्ते (वय ४३) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, सुशांत रावसाहेब तारदाळे उर्फ छोटू पुजारी (रा. मलगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सुशांत तारदाळे उर्फ छोटू पुजारी हा मोपेड ॲक्टिवा मोटारसायकल (एमएच-१०-सीई-4292) वरून शितल जत्ते यांना सोबत घेऊन जात होता. मालगाव गावच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरून छोटू हा भरधाव वेगात मोटारसायकल चालवत होता. मोटरसायकल महामार्गाच्या पश्चिम बाजूस आली असता तेथे असलेल्या मातीच्या ढिगारावर चढली. त्यामुळे पाठीमागे बसलेले शितल जत्ते हे खाली पडून त्यांच्या डोक्याला मोठा दगड लागला. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जत्ते यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर छोटू याने जखमी जत्ते यांना रुग्णालयात दाखल करायचे सोडून तेथून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या भावाने घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून, मोटरसायकलस्वार छोटू पुजारी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!

Next Post

मोठी बातमी: एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार करणार ‘राज’ ठाकरेंच्या ‘रेल्वे इंजिनाने’ राजकीय प्रवास..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी: एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार करणार ‘राज’ ठाकरेंच्या ‘रेल्वे इंजिनाने’ राजकीय प्रवास..?

मोठी बातमी: एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार करणार 'राज' ठाकरेंच्या 'रेल्वे इंजिनाने' राजकीय प्रवास..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group