• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | डिझेल चोरताना दोघांना रंगेहाथ पकडले

Admin by Admin
June 27, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगली | डिझेल चोरताना दोघांना रंगेहाथ पकडले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी: पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या ट्रॅक्टरमधील डिझेल चोरताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. बायपास रस्त्यावर हा प्रकार घडला. चोरट्यांनी चोरलेले दहा लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे.

जोतीराम जाधव व लालसिंग दुधे (दोघे रा. सांगली) अशी या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत अमर धनंजय जाधव (वय 39, रा. गजानन हौसिंग सोसायटी, गोवारे, ता. कराड) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जाधव यांनी बायपास रस्त्यावर लक्ष्मी गॅरेज येथील पार्किंगमध्ये त्यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच 09 सीयू-5470) लावला होता. दि. 23 जूनरोजी सकाळी अकरा वाजता संशयित तिथे प्लॉस्टिकचा कॅन घेऊन गेले.

ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत पाईप टाकून कॅनमध्ये ते डिझेल काढत होते. गॅरेजमधील कर्मचार्‍यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर या दोघांना पकडण्यात आले. शहर पोलिसांना पाचारण करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

दहा लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 960 रुपये आहे. संशयितांनी आणखी कोठून वाहनामधील पेट्रोल-डिझेलची चोरी केली आहे का, याबद्दल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

मोठी बातमी: एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार करणार ‘राज’ ठाकरेंच्या ‘रेल्वे इंजिनाने’ राजकीय प्रवास..?

Next Post

मोठी बातमी | बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का: खात्याचं फेरवाटप : मुख्यमंत्र्यांचा निर्णय : पहा ,कोणाकडे कोणतं खातं..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का: खात्याचं फेरवाटप : मुख्यमंत्र्यांचा निर्णय : पहा ,कोणाकडे कोणतं खातं..!

मोठी बातमी | बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का: खात्याचं फेरवाटप : मुख्यमंत्र्यांचा निर्णय : पहा ,कोणाकडे कोणतं खातं..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group