• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील शिवसैनिक मुंबईत दाखल…

Admin by Admin
June 26, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरजेतील शिवसैनिक मुंबईत दाखल…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत ३९ आमदारांसह गुवाहाटीमध्ये जाऊन ठाकरे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींत राज्यातील शिवसैनिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी थेट मुंबई गाठली आहे.

मिरजेतील शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्ष मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे सांगितले आहे. काल शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदा पवार यांनी शिंदे गटास पाठिंबा देत असल्याचे सांगितल्यानंतर दुसरे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी जिल्ह्यातील शिवसैनिक असल्याचे सांगितले आहे. ते काल मुंबई येथील शिवसेनेकडून तातडीने बोलावलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांचा पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे.

सांगली, मिरजेतील प्रमुख शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना होत सेना खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. यामध्ये जिल्हा उपप्रमुख महादेव मगदूम, सांगली शहरप्रमुख मयूर घोडके, मिरज शहराप्रमुख चंद्रकांत मैगुर, तालुकाप्रमुख संजय काटे, मिरज विधानसभा क्षेत्राप्रमुख तानाजी सातपुते आदी पदाधिकारी मुंबई येथे शिवसेना भवनवर गेले आहेत.

Previous Post

‘त्या’ मांत्रिकाच्या शोधासाठी पथके रवाना

Next Post

ब्रेकिंग | शिवसेनेला आणखी एक धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ मंत्री गेला आज दुपारी शिंदेसेनेत..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | शिवसेनेला आणखी एक धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ मंत्री गेला आज दुपारी शिंदेसेनेत..!

ब्रेकिंग | शिवसेनेला आणखी एक धक्का..! शिवसेनेचा 'हा' मंत्री गेला आज दुपारी शिंदेसेनेत..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group