• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | शिवसेनेला आणखी एक धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ मंत्री गेला आज दुपारी शिंदेसेनेत..!

Admin by Admin
June 26, 2022
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | शिवसेनेला आणखी एक धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ मंत्री गेला आज दुपारी शिंदेसेनेत..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या महा मिडीया । २६ जून २०२२ । शिंदे गटाच्या बंडखोरीने शिवसेना हादरली असून बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात. मात्र दुसरीकडे शिवसेनेला पुन्हा झटका बसला आहे.

तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता राज्यातील आणखी एक मंत्री गेला असण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही.

बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेतून होणारी आमदारांची गळती थांबण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास 50 आमदारांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीमध्ये थांबले आहेत.

आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. उदय सामंतही त्यांना जाऊन मिळाल्यास बंडखोरांचे बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे गुवाहाटीसाठी रवाना झाल्याचे सांगण्यात येते आहे.

Previous Post

मिरजेतील शिवसैनिक मुंबईत दाखल…

Next Post

एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता

एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group