• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शरद पवार यांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

Admin by Admin
March 25, 2022
in विशेष, राजकीय
1 min read
0
शरद पवार यांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व मानले जातात. अनेकदा आपल्या राजकीय विधानांमुळे ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण सध्या त्यांची चर्चा एका वेगळ्याच कारणाने होताना दिसतेय.

शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जय पवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये उर्वशी आणि जय यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. तिघेही कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे? जय उर्वशीला डेट तर करत नाही ना? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हे दोघे केवळ एका शो निमित्ताने एकत्र आले असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान बॉलिवूडमध्ये फार कमी काळात उर्वशीनं स्वतःची वेगळी जागा तयार केली आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजचं दिग्दर्शन नीरज पाठक करत आहे. याशिवाय उर्वशीकडे काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टही आहेत.

Previous Post

“जन्माला आलो तेव्हापासून दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही “- अजित पवार

Next Post

मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, बहाद्दराने डॉक्टरला घातला ५० लाखांचा गंडा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, बहाद्दराने डॉक्टरला घातला ५० लाखांचा गंडा.

मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, बहाद्दराने डॉक्टरला घातला ५० लाखांचा गंडा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group