• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“जन्माला आलो तेव्हापासून दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही “- अजित पवार

Admin by Admin
March 25, 2022
in मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
“जन्माला आलो तेव्हापासून दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही “- अजित पवार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी आणि दारूवरील कर कमी करण्याचे निर्णय काही दिवसांपुर्वी जाहीर केले होते. या वाईन प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होते.

विरोधी पक्ष भाजपने देखील सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतंं. समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या निर्णया विरोधात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावरून बराच वाद पाहायला मिळाला.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, “काही ठिकाणी दारूवर ३०० टक्के कर होता. तो आम्ही १५० टक्क्यांवर आणला. कारण जे लोक दिल्लीला जायचे, ज्यांना दारूची सवय आहे, असे लोक येताना दोन्ही हातात ४-४ बाटल्या घेऊन यायचे. कारण तिथे शुल्क कमी होतं. त्यामुळे कर कमी केला, घेणारा घेतच असतो. कर कमी केल्यापासून सरकारच्या उत्पन्नात १०० कोटींवरून ३०० कोटींपर्यंत वाढ झाली आहे” असं स्पष्टीकरण अजित पवारांनी अधिवेशनात दिले.

तसेच “आपल्यावर जबाबदारी आल्यामुळे राज्याच्या हिताचा आणि उत्पन्नाचा विचार करावा लागतो त्यासाठी हे केलं, असं अजित पवार म्हणाले. “ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत एका थेंबाला स्पर्श केला नाही हे सगळ्यांना माहिती आहे” असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

Previous Post

….अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ ,निशिकांत पाटील यांचा जयंतरावांना इशारा

Next Post

शरद पवार यांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शरद पवार यांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

शरद पवार यांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group