• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अनैतिक संबंधातून वाघवाडीत महिलेचा गळा आवळून खून..?

Admin by Admin
June 16, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अनैतिक संबंधातून वाघवाडीत महिलेचा गळा आवळून खून..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर; बापूसाहेब कांबळे – खबऱ्या प्रतिनिधी : वाघवाडी (ता. वाळवा) येथे ओढणीने गळा आवळून महिलेचा खून केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. प्रियांका सुनील गुरव (वय 28, रा.तुजारपूर, ता. वाळवा) असे महिलेचे नाव आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. खूनप्रकरणी संशयित तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सायंकाळी वाघवाडी येथील बांदल शिवारात शेतकर्‍यांना महिलेचा मृतदेह दिसला. या घटनेने खळबळ उडाली. ही माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

वाघवाडी-शिवपुरी रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर शेतात प्रियांका यांचा मृतदेह होता. अंगावर जखमेच्या खुणा होत्या. मानेवर गळा आवळल्याची खूण होती. बाजूस ओढणी पडली होती. प्रियांका यांच्या मृतदेहाजवळ दोन पिशव्या पडल्या होत्या. त्यामध्ये त्यांचे कपडे, मेकअपचे साहित्य तसेच काही आंबेही पडले होते. घटनास्थळी सिगारेटचे पाकीट, दारूची बाटली, शेंगदाण्याची पुडी पडलेली होती. हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

अनैतिक संबंधातून खून?

प्रियांका यांचा खून अमानुषपणे केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रियांका यांच्या मानेचे हाड मोडले होते. हा खुनाचा प्रकार मंगळवारी रात्री घडल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. पोलिसांनी स्थानिक खबर्‍यांमार्फत माहिती घेतली. त्यावेळी प्रियांका यांचा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. पोलिसांनी रात्री उशिरा प्रियांका यांच्या खूनप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

Previous Post

मिरजेतील ‘कलेक्शन’ करणारा बहुचर्चित सहाय्यक पोलीस फौजदार रवीशंकर चव्हाण लाचलूचपतच्या जाळ्यात रंगेहाथ अटक..! एक हजाराच्या लाचेसाठी लाज सोडली, पोलीस दलात खळबळ..!!

Next Post

सांगली : बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाची फसवणूक; आसंगी येथील प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाची फसवणूक; आसंगी येथील प्रकार

सांगली : बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाची फसवणूक; आसंगी येथील प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group