• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाची फसवणूक; आसंगी येथील प्रकार

Admin by Admin
June 16, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाची फसवणूक; आसंगी येथील प्रकार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत; खबऱ्या प्रतिनिधी: आसंगी (ता. जत) येथील चौघांनी जमिनी खरेदीसाठी मयत व्यक्तीच्या नावे बनावट प्रतिज्ञापत्र करून शासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मंडल अधिकारी मारुती खोत यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी किरण लक्ष्मण सावंत, राहुल लक्ष्मण सावंत, भौरव्वा लक्ष्मण सावंत व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आसंगी येथील बाबांन्ना ओंकारी सर्जे यांच्या जमिनीचा व्यवहार झाला होता. परंतु या जमिनीवर शेरा असल्याने याकरिता प्रांताधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होते. दरम्यान, सर्जे हे मयत झालेे. असे असताना संशयितांनी परवानगीसाठी संख येथील महा-ई-सेवा केंद्रात जमीन विक्री करण्यासाठी परवानगी मिळण्याकामी मयत सर्जे या व्यक्तीच्या नावे खोटा अर्ज करून त्याखाली बनावट अंगठा केला आहे. तसेच एका अनोळखी व्यक्तीला मयत व्यक्तीच्या ठिकाणी उभा करून त्याचे प्रतिज्ञापत्र केले आहे. सदरचा प्रकार अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उमदी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

अनैतिक संबंधातून वाघवाडीत महिलेचा गळा आवळून खून..?

Next Post

मिरज ‘सिव्हिल’ च्या जागेचे तुकडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ‘सिव्हिल’ च्या जागेचे तुकडे

मिरज 'सिव्हिल' च्या जागेचे तुकडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group