• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील ‘कलेक्शन’ करणारा बहुचर्चित सहाय्यक पोलीस फौजदार रवीशंकर चव्हाण लाचलूचपतच्या जाळ्यात रंगेहाथ अटक..! एक हजाराच्या लाचेसाठी लाज सोडली, पोलीस दलात खळबळ..!!

Admin by Admin
June 15, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील ‘कलेक्शन’ करणारा बहुचर्चित सहाय्यक पोलीस फौजदार रवीशंकर चव्हाण लाचलूचपतच्या जाळ्यात रंगेहाथ अटक..! एक हजाराच्या लाचेसाठी लाज सोडली, पोलीस दलात खळबळ..!!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज | खबऱ्या प्रतिनिधी ; मिरज येथील बहुचर्चित असणारा आणि कोणाचीही भीती न बाळगणारा, वरिष्ठांच्या आदेशाला नेहमीच केराची टोपली दाखवणारा लोकसेवक रविशंकर रामचंद्र चव्हाण, वय ५३ वर्ष, रा. फ्लॅट नं.९, सि.स.नं.१४८७, इंदिरा अपार्टमेंट, रिसाला रोड,सांगली व नोकरीस कार्यरत (महात्मा गांधी पोलीस चौकी,मिरज) येथील सहाय्यक पोलीस फौजदार यांना १,०००/- रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

लाचखोर चव्हाण यांच्या नेहमीच्या पठाणी वसुलीला वडाप चालक, रिक्षावाले, वाहनधारक तसेच सामान्य नागरिक वैतागले होते. एका रिक्षाचालकाच्या रिक्षावर कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचारी रवी चव्हाण यांनी १०००/- रूपये लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचखोर पोलीस रविशंकर चव्हाणच्या रंगेहाथ मुसक्या आवळल्या .रवी चव्हाण यांच्या विरुध्द महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कारवाई राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे (पोलीस उप अधीक्षक) दत्तात्रय पुजारी (पोलीस निरीक्षक,) विनायक भिलारे (पोलीस निरीक्षक,) पोलीस अंमलदार अविनाश सागर, अजित पाटील, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, संजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, श्रीपती देशपांडे भास्कर भोरे, सिमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

या कारवाईने मिरज पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

पीआय अन एएसआय मध्येच जुंपली..! जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप..

Next Post

अनैतिक संबंधातून वाघवाडीत महिलेचा गळा आवळून खून..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अनैतिक संबंधातून वाघवाडीत महिलेचा गळा आवळून खून..?

अनैतिक संबंधातून वाघवाडीत महिलेचा गळा आवळून खून..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group