Sunday, June 8, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पीआय अन एएसआय मध्येच जुंपली..! जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप..

Admin by Admin
June 15, 2022
in क्राईम
0
पीआय अन एएसआय मध्येच जुंपली..! जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बुलडाणा : खबऱ्या प्रतिनिधी ; जुगारावरील छाप्यावरून बुलडाण्यातील बोराखेडीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि एएसआय राजेश आगाशे यांच्यात चांगलीच जुंपलीय.

या प्रकरणात तुम्ही 60 हजार रुपये घेतले आणि एसपी साहेबांनी तुमची चौकशी करायला सांगितले आहे, असे पोलिस निरीक्षक पाटील यांनी एएसआय आगाशे यांना म्हटलंय. या बाबतची पोस्ट, कारवाईचा व्हिडीओ, दोन आरोपींचा जबाब सह इतर मजकूर आगाशे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ठाणेदारांप्रती संताप व्यक्त केलाय. तसेच मी पैसे घेतल्याचे सिद्ध करून दाखवा, असं चॅलेंजही केलंय. तर, पोलीस निरीक्षक पाटील यांनी या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी सुरू असून, चौकशीअंती सत्य काय ते समोर येईल असं म्हटलंय. दरम्यान, पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यामधील हा वाद खूप तापला असून, त्यामुळे बोराखेडी पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

नेमकं काय प्रकरण?

बोराखेडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय राजेश आगाशे सह इतर तीन कर्मचाऱ्यांनी 10 जूनला लोखंडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगारावर छापा मारला होता. यावेळी चार जणांना पकडले होते. त्यांच्या ताब्यातून 80 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, रोख 3060 रुपये आणि 20 रुपयांचा ताशपत्ता असा एकूण 83 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला होता.

आरोप काय?

दरम्यान, मोताळा बिट अंमलदार राजेश आगाशे यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रूपवर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात 60 हजार रुपये घेतले असून, एसपी साहेबांनी तुमची चौकशी करायची सांगितले आहे, असे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी म्हटल्याचा दावा राजेश आगाशे यांनी केलाय. रविवारी सायंकाळी त्यांनी याबाबत पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती. सोबतच पुरावा म्हणून जुगारावरील कारवाईचा व्हिडीओ आणि दोन आरोपींच्या जबाबाचे पत्र ही पोस्ट केलेत. तसंच मी जर पैसे घेतल्याचे खरं असेल तर सिद्ध करून दाखवा, असा चॅलेंज करणारा मजकूर सुद्धा पोस्ट केलाय. ठाणेदार आणि पोलिस कर्मचाऱ्यामधील हा वाद सोशल मीडियावर धडकताच बोराखेडी पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

कोण काय म्हणालं?

दरम्यान, ठाणेदार पाटील यांनी आरोपींचा जबाब नोंद केला असून, एएसआय राजेश आगाशे यांनीसुद्धा आरोपींचा जबाब घेतलाय. आगाशे यांच्याकडे दिलेल्या जबाबात एका आरोपीने लिहून दिलेय की, ठाणेदार पाटील यांनी मला जुगार प्रकरणात जप्त केलेल्या पैशांबद्दल सखोल विचारपूस केलीय. त्यावेळी संबंधीत व्यक्तीने त्याच्याकडून 1500 रुपये जप्त केल्याचे सांगितले. यावर ठाणेदार राजेंद्र पाटील म्हणाले की, तुमच्याकडे नगदी 20 हजार रुपये होते, असे सांगा. मी तुमची जुगारात पकडलेली दुचाकी सोडून देतो, असंही सांगितले. तेव्हा संबंधिताने माझ्याकडे पंधराशे रुपयेच होते. मी खोटं बोलत नाही. कोणाला फसवत नाही, असे म्हटल्याचा जबाब आगाशे यांच्याकडे दिलाय.

तर, दुसऱ्या आरोपीला बोराखेडी येथील एका व्यक्तीने सांगितले की, तू ठाणेदार पाटील यांना सांग की, आगाशेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी तुझ्याकडून 40 हजार रुपये घेतले. आपल्याला बिट जमादार आगाशे यांचा गेम करायचा आहे. त्यांची बिट काढायची आहे. यावर संबंधिताने सांगितले की, माझ्याकडून 1200 रुपये जप्त करण्यात आले असून ठाणेदारांनी विचारपूस करण्यासाठी बोलावले असता, पोलिसांनी त्याच्याकडून 1200 रुपये जप्त केल्याचे ठाणेदारांना सांगितले, असे जबाबात नमूद करण्यात आलंय. बिट अंमलदार राजेश आगाशे यांनी जुगार छाप्यातील कारवाईचा व्हिडीओ, आरोपींचा जबाब आणि इतर मजकूर व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करणे चुकीचे असून, त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप केलाय. सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू असून, चौकशीअंती सत्य काय आहे, हे समोर येईल.

चौकशी सुरु

एकंदरीत जुगारावरील छाप्यात 60 हजार रुपये घेतल्याचा मुद्दा बुलडाण्यात चांगलाच तापलाय. यामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य काय ते समोर आणण्याची गरज आहे, अशी मागणी केली जात आहे. बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या असून, अवैध धंद्यांना ऊत आलाय. त्यात जुगार प्रकरणात 60 हजार घेतल्याच्या मुद्द्यावरून ठाणेदार आणि पोलिस कर्मचाऱ्यात जुंपलीय. त्यामुळे पोलिस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेलीत. बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जातेय. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

मिरज | पोलिस अधिकारी रविराज फडणीस यांच्या टीमने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईतांना घेतले ताब्यात ..! स्मार्ट पोलिसिंगची चर्चा मिरजकरांच्यात..!!

Next Post

मिरजेतील ‘कलेक्शन’ करणारा बहुचर्चित सहाय्यक पोलीस फौजदार रवीशंकर चव्हाण लाचलूचपतच्या जाळ्यात रंगेहाथ अटक..! एक हजाराच्या लाचेसाठी लाज सोडली, पोलीस दलात खळबळ..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील ‘कलेक्शन’ करणारा बहुचर्चित सहाय्यक पोलीस फौजदार रवीशंकर चव्हाण लाचलूचपतच्या जाळ्यात रंगेहाथ अटक..! एक हजाराच्या लाचेसाठी लाज सोडली, पोलीस दलात खळबळ..!!

मिरजेतील 'कलेक्शन' करणारा बहुचर्चित सहाय्यक पोलीस फौजदार रवीशंकर चव्हाण लाचलूचपतच्या जाळ्यात रंगेहाथ अटक..! एक हजाराच्या लाचेसाठी लाज सोडली, पोलीस दलात खळबळ..!!

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

by Admin
June 5, 2025
0

अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज)...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड...

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

by Admin
June 3, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातील विजापूर वेस येथे असणार्‍या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group