• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | पोलिस अधिकारी रविराज फडणीस यांच्या टीमने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईतांना घेतले ताब्यात ..! स्मार्ट पोलिसिंगची चर्चा मिरजकरांच्यात..!!

Admin by Admin
June 15, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज | पोलिस अधिकारी रविराज फडणीस यांच्या टीमने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईतांना घेतले ताब्यात ..! स्मार्ट पोलिसिंगची चर्चा मिरजकरांच्यात..!!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : मिरजेत दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच दरोडेखोरांचा डाव फसला असून त्यांचा दरोड्याचा मनसुबाच मिरज पोलिसांनी उधळला. गुन्हाच्या तयारी असणाऱ्या सराईतांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी कटावणी, सळी, हातोडा, मिरची पूड इत्यादी दरोड्यातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीशैल राम राजमाने (वय 30, रा. हुळ्ळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज), अंनिस अल्ताफ सौदागर (वय 25, रा. दुर्गानगर, कुपवाड रस्ता, मिरज), हनिफ रज्जाक शेख (वय 24), रियाज उर्फ मिर्गी बडेसाहेब शेख (वय 40, दोघे रा. म्हाडा कॉलनी, म्हैसाळ रस्ता, मिरज) व एक अल्पवयीन अशा पाच जणांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी उपनिरीक्षक कुमार पाटील यांना दरोड्याच्या तयारी असणारे पाच जण रेल्वे स्थानक रस्त्यावरील रेल्वे पोलिस लाईनजवळ खोक्याच्या पाठीमागे लपून बसले असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक पाटील यांनी तातडीने सहाय्यक निरीक्षक रवीराज फडणीस यांना याबाबत माहिती दिली. कारवाईचे आदेश मिळताच उपनिरीक्षक पाटील यांनी सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष पाटील, उदय कुलकर्णी व अन्य पोलिस पथकासह पाच जणांवर छापा टाकला. त्यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, मिरची पूड, लोखंडी सळी, हातोडा आणि दोन मोटारसायक आढळून आली. पोलिसांनी 30 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Previous Post

मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यपालांना दिली ऑफर ..म्हणाले,…

Next Post

पीआय अन एएसआय मध्येच जुंपली..! जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पीआय अन एएसआय मध्येच जुंपली..! जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप..

पीआय अन एएसआय मध्येच जुंपली..! जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group