• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यपालांना दिली ऑफर ..म्हणाले,…

Admin by Admin
June 15, 2022
in राजकीय
1 min read
0
मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यपालांना दिली ऑफर ..म्हणाले,…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामधील वाद सर्वश्रुत आहे.

आज राज्यपालांच्या जलभूषण या नवीन निवास्थानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, द्वारपूजन पार पडले. ‘बहोत बडा, अच्छा मकान बनाया आपने, एक्सेंज करायचं का’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या समोरच ऑफर देऊन टाकली. राज्यपालांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘ जलभूषण ‘इमारतीचे उद्घाटन, द्वारपूजन पार पडले. त्यानंतर राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला. ‘आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व्यासपीठावर उपस्थितीत आहे’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याकडे पाहून स्मित हास्य केलं. ‘जसं हे क्रांती भवन उभारलं आहे, तसंच राज्यपालांनी जलभूषण तयार केलं आहे. बहुत बडा अच्छा मकान बनाया है आपने, एक्सेंज करायचं का?

मी ते बघतील, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना ऑफरच देऊन टाकली. यावेळी सभागृहात एकच हश्शा पिकली. ‘काय बोलावे, याची पंचाईत आहे. ज्या एका कार्यक्रमासाठी आपण इथं हजर आहोत.

या कार्यक्रमाला राष्ट्रपती हजर होते. एक गोष्ट नक्की स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना या दालनाचे उद्घाटन आणि लोकार्पण आणि मुहुर्त हे मोदींच्या हस्ते होत आहे, असं म्हणत मोदींचे आभार मानले. स्वातंत्र्य आपण उद्भभोगतोय, त्यांनी देशासाठी घरावर निखारे ठेवले, हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळालं. हे स्वातंत्र्य आपल्याला जपवून ठेवता आले पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे एक तिर्थस्थळ आहे, महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने आपण एक पुस्तक तयार करत आहोत. स्वातंत्र्यासाठी जे जे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे संकलन व्हावे यासाठी काम हाती घेतले आहे. आपल्या देशासाठी एखादं जरी काम आपल्या हातून घडले तरी ते क्रांतीकारकांच्या बलिदानासाठी कृतार्थ होतील, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ‘काळ बदलला असला तरी या परिसरातील वास्तू या इतिहासाच्या पाऊल खुना आणि वारसा जपणाऱ्या आहे. त्याला कुठलाही धक्का न देता उभारले आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते विनोद मोरे “राज्यस्तरीय पर्यावरण मित्र” पुरस्काराने सन्मानित..

Next Post

मिरज | पोलिस अधिकारी रविराज फडणीस यांच्या टीमने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईतांना घेतले ताब्यात ..! स्मार्ट पोलिसिंगची चर्चा मिरजकरांच्यात..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | पोलिस अधिकारी रविराज फडणीस यांच्या टीमने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईतांना घेतले ताब्यात ..! स्मार्ट पोलिसिंगची चर्चा मिरजकरांच्यात..!!

मिरज | पोलिस अधिकारी रविराज फडणीस यांच्या टीमने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईतांना घेतले ताब्यात ..! स्मार्ट पोलिसिंगची चर्चा मिरजकरांच्यात..!!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group