मिरज : खबऱ्या प्रतिनिधी; खंडेराजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद बाळासाहेब मोरे यांच्या पर्यावरण ,प्राणी संवर्धन व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन मोरे यांना “राज्यस्तरीय पर्यावरण मित्र” या पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते इस्लामपूर येथे नुकतेच 29 मे रोजी वितरण करण्यात आले.
या कामगिरीबद्दल आणि कामाची पोहचपावती म्हणून मिळालेल्या पुरस्काराबद्दल परिसरातून मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणी संवर्धन अभियान, महाराष्ट्र राज्य या समितीच्या सदस्यपदी असलेले विनोद मोरे यांनी “पर्यावरणाचे रक्षण हेच देशाचे रक्षण” याप्रमाणे उल्लेखनीय काम केले आहे. अनेकांना पर्यावरण संरक्षण, प्राणी संवर्धन अभियानात सहभागी केले आहे.
पर्यावरण संरक्षणाचा व सामाजिक कार्याचा ध्यास असणाऱ्या विनोद मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन दिशा निसर्ग पर्यावरण व पाणी संवर्धन अभियान तसेच पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, वनरक्षक कार्यालय आणि क्लेश प्रतिबंधक सोसायटी सांगली ,महाराष्ट्र शासन व दिशा पर्यावरण आणि संवर्धन अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना पर्यावरण मित्र राज्यस्तरीय पुरस्काराने आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणी संवर्धन अभियान महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल जाधव , सचिव सुरज जाधव व पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धकाते यांच्यासहित अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

