• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

….अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ ,निशिकांत पाटील यांचा जयंतरावांना इशारा

Admin by Admin
March 25, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
….अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ ,निशिकांत पाटील यांचा जयंतरावांना इशारा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर, खबऱ्या प्रतिनिधी/ जयंतराव, र‍ाजकीय संघर्ष राजकारणापुरताच मर्यादित ठेवा. तो संस्थात्मक पातळीवर आणू न‍का. अन्यथा तुम्हाला ज्या भाषेत समजेल, त्या भाषेत उत्तर दिले जाईल.

मी संघर्षाला घाबरत नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना पत्रकार बैठकीत दिला.

कुटील राजकारण करत मंत्रीपदाचा गैरवापर करुन आमच्या संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न कराल, तर आम्हालाही तुमच्या संस्थेत लक्ष घालावे लागेल. तुमच्या संस्थांच्या गैरव्यवहाराच्या फाईली आमच्याकडे आहेत. अफगाणिस्तानला पाठवलेली साखर शत्रूराष्ट्र पाकिस्तानात कशी पोहोचली? त्याचे पैसे दुबईत कोणी घेतले, हे सर्व योग्यवेळ येताच जाहीर करु, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

निशिकांत पाटील म्हणाले, जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी पालकत्वाची जबाबदारी पार पाडत सर्वांना बरोबर घेवून जायला हवे. मात्र, त्यांनी जिल्ह्यात आपला विरोधकच तयार होवू नये म्हणून त्या़ंच्या संस्था अडचणीत आणून विरोधकच संपविण्याचे कुचके राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश देवून प्रकाश हॉस्पिटलवर खोटे गुन्हे दाखल करायला सांगितले आहे. यासाठी पोलिसांवरही दबाव आणला जात आहे. हे सर्व कुटील राजकारण त्यांनी थांबविले नाहीतर यापुढे त्यांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. संघर्ष मला नवा नाही. जयंत पाटील यांच्याशी आता टोकाचाच संघर्ष राहिल, असेही पाटील यांनी सांगितले.

Previous Post

गडकरी साहेब, तासगाव, आरवडेजवळील रस्त्यावरून गाडी चालवून दाखवा आणि हाडे खिळखिळी करून घ्या

Next Post

“जन्माला आलो तेव्हापासून दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही “- अजित पवार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“जन्माला आलो तेव्हापासून दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही “- अजित पवार

"जन्माला आलो तेव्हापासून दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही "- अजित पवार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group