• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुस्लिम समाजाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Admin by Admin
June 11, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मुस्लिम समाजाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्‍तव्याच्या निषेधार्थ सांगली, मिरज शहरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी रस्त्यावर काही काळ ठिय्या आंदोलन करीत घोषणा दिल्या.

शर्मा यांनी वक्‍तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी असंतोष व्यक्‍त केला. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा मेसेज समाज माध्यमाद्वारे फिरू लागला. त्यानंतर सांगली आणि मिरज शहरातील हजारो मुस्लिम समाजातील कार्यकर्ते सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून शर्मा आणि केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. शर्मा यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

ऑल इंडिया इमाम कॉन्सिलचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हनीफ शेख यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, शर्मा यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. कोणत्याही धर्माविरुद्ध अपशब्द वापरल्यास कडक कायदा तयार करावा, भाजप, आरएसएस या सारख्या संघटनांना लगाम लागावा. शेकडो नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होत निषेध केला.

Previous Post

‘त्या’ १७ पोलिसांचा चौकशी अहवाल धूळखात..!

Next Post

सांगली : अप्पर तहसीलदारांचे बनावट पत्र दाखवून डंपर सोडविला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

सांगली : अप्पर तहसीलदारांचे बनावट पत्र दाखवून डंपर सोडविला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group