• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : अप्पर तहसीलदारांचे बनावट पत्र दाखवून डंपर सोडविला

Admin by Admin
June 11, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी ; बेकायदेशीर मुरुम वाहतुकीप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला डंपर सोडविण्यासाठी अप्पर तहसीलदार यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बनावट पत्राने पोलिसांना डंपर देण्यास भाग पाडून फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय दरगोंडा पाटील (रा. कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शासकीय अधिकारी कीर्तीकुमार भगवान धस यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा मुरूम वाहतूक केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी ११ मार्च २०२२ रोजी डंपर (एमएच ५० एएन ३३४४) जप्त केला होता. हा डंपर सोडवण्यासाठी अक्षय याने अप्पर तहसीलदार यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क्याचे पत्र तयार केले. त्यावर बनावट जावक क्रमांकदेखील टाकून ते खरे आहे असे भासवले. हे पत्र सांगली ग्रामीण पोलिसांना दिले. कायदेशीर पंचनामा व दंडच्या रकमेची कार्यवाही पूर्ण करून न घेता डंपर मालकाच्या ताब्यात देण्यात पोलिसांना भाग पाडले. हा प्रकार घडल्यानंतर चौकशीत अक्षय याने बनावट पत्र बनवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार श्री. धस यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अक्षय पाटीलविरूद्ध फिर्याद दिली. फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

मुस्लिम समाजाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Next Post

“नुपूर” कोणाच्या पायातले ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“नुपूर” कोणाच्या पायातले ?

"नुपूर" कोणाच्या पायातले ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group