• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना

Admin by Admin
June 10, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी ; पूर्ववैमनस्यातून संजय बाबू बुटिया (वय 35) व त्यांच्या पत्नीस बेदम मारहाण करण्यात आली. गणेशनगरमधील काळे प्लॉटमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण लालजी बुटिया, राज लालजी बुटिया, राजेश लालजी बुटिया व सचिन लालजी बुटिया (सर्व रा. रॉकेल गल्ली, गणेशनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नाव आहेत. फिर्यादी संजय बुटिया मूळचे गुजरातमधील आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते सांगलीत गणेशनगरमध्ये राहतात. त्यांचा संशयितांशी किरकोळ कारणावरुन गेल्या आठवड्यात वाद झाला होता. यातून त्यांनी बुटिया यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पत्नीस ओठावर ठोसा मारून जखमी केले होते.

बुटिया यांच्या शेजारील रहिवाशांनी गर्दी केल्यानंतर संशयित पळून गेले. त्यानंतर बुटिया यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

Previous Post

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांची टोळी जेरबंद

Next Post

सांगली : महापालिकेतील 350 फाईल झाल्या गतिमान

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : महापालिकेतील 350 फाईल झाल्या गतिमान

सांगली : महापालिकेतील 350 फाईल झाल्या गतिमान

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group