• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांची टोळी जेरबंद

Admin by Admin
June 10, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांची टोळी जेरबंद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : सांगली, मिरज व कुपवाड येथे भरदिवसा बंद फ्लॅट आणि बंगले फोडणार्‍या तिघांच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी यश आले.

टोळीत तिघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 20 दिवसांपूर्वी मिरजेत झालेल्या दोन घरफोडी गुन्ह्यांचा उलघडा झाला आहे. या गुन्ह्यातील दागिनेही जप्त केले आहेत.

अटक केलेल्यांमध्ये प्रकाश बाबूराव जाहेन्नावर (वय 19, सावळी, ता. मिरज), शहजाद सलीम शेख (20, रामकृष्णनगर, कुपवाड) व आकाश उर्फ लोकेश लक्ष्मण जाधव (25, कुपवाड) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमिवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचेे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांचे पथक गुरुवारी शहरात गस्त घालत होते.

पथकातील पोलिस हवालदार आर्यन देशिंगकर व प्रशांत माळी यांना कुपवाड येथेे तीन संशयित चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकानेे या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली, पण ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी करण्यासाठी फिरत असल्याची कबुली दिली.

संशयितांनी 20 दिवसांपूर्वी मिरज व कुपवाड येथे दोन घरे फोडून दागिने लंपास केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील 60 हजार रुपये किंमतीचे दागिनेही जप्त करण्यात पथकाला यश आले. याप्रकरणी महात्मा गांधी चौक व कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होेण्याची शक्यता आहे. यातील लोकेश जाधव व शहजाद शेख हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध घरफोडी व मारामारीचे गुन्हे दाखल आहे. जाधव हा तडीपार आहे. तरीही तो येथेे येऊन साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Previous Post

महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ : पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासहित सात जणांवर गुन्हे दाखल : पोलीस मारहाणीत मनोरुग्ण मृत्यू प्रकरण..

Next Post

सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना

सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group