• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ : पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासहित सात जणांवर गुन्हे दाखल : पोलीस मारहाणीत मनोरुग्ण मृत्यू प्रकरण..

Admin by Admin
June 9, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : खबऱ्या प्रतिनिधी ; पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मनोरूग्णाच्या मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या चौकशीअंती सक्करदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार, हवालदारासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सीआयडीचे पोलीस उपाअधीक्षक सुरेंद्र धुमाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत पांडूरंग सीद, पोलीस हवालदार कैलास दामोदर, मेहरास सर्फुद्दीन शेख, युसूफ हसन खान, अनवर हुसैन जिगरीभाई तसेच एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.

१६ ते १८ डिसेंबर २०१९ दरम्यान ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा ताजबाग परिसरात घडली होती. उत्तरप्रदेशातील बलरामपूर जिल्ह्याच्या उत्तरला तहसीलमधील जैलिया गजपूर येथील रहिवासी मो. फैजान (वय ३६) हा व्यक्ती मनोरूग्ण होता. तो ताजबाग येथे आला होता. घटनेच्या दिवशी तो विक्षिप्तपणे वागू लागल्याने त्याला धार्मिक स्थळावरील सुरक्षा रक्षक मेहरात सर्फुद्दीन शेख, युसूफ हसन खान, अनवर हुसैन जिगरी भाई आणि आणखी एका व्यक्तीने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. सक्करदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत पांडूरंग सीद, हवालदार कैलास दामोदर घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी फैजान अहमदला दोरीने बांधून बेदम मारहाण केली.विशेष म्हणजे तो मनोरुग्ण असल्याची माहिती होती. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार करण्याची गरज होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यातच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सीआयडीला देण्यात आले. त्यांनी चौकशी करून तत्कालीन ठाणेदार अजीत सीद, हवालदारासह ७ जणांवर गुन्हे दाखल केले.

Previous Post

मिरज : एपीआय ‘फडणीसांच्या’ कारवाईचा धडाकेबाज रेटा..! जप्त केल्या साडेतीन लाखांच्या बनावट नोटा.

Next Post

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांची टोळी जेरबंद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांची टोळी जेरबंद

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांची टोळी जेरबंद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group