• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज : एपीआय ‘फडणीसांच्या’ कारवाईचा धडाकेबाज रेटा..! जप्त केल्या साडेतीन लाखांच्या बनावट नोटा.

Admin by Admin
June 9, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज : एपीआय ‘फडणीसांच्या’ कारवाईचा धडाकेबाज रेटा..! जप्त केल्या साडेतीन लाखांच्या बनावट नोटा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी : मिरजेत पोेलिसांनी छापा टाकून 3 लाख 56 हजार 170 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. जिल्ह्यातील बनावट नोटांचे कनेक्शन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

उमर खुदबुद्दीन एकसंबेकर (रा. सोमवार पेठ, कागल, जि. कोल्हापूर), नदीम सज्जान नालबंद (रा. नदीवेस नाका, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) आणि शब्बीर साहेबहुसेन पिरजादे (रा. गुरुवार पेठ, मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 10 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तिघे संशयित हे बनावट नोटा घेऊन मिरजेतून कृष्णाघाटच्या दिशेने एका कारमधून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक मंगळवारी मध्यरात्री कृष्णाघाट रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. खबर्‍याने दिलेल्या माहिती प्रमाणे विनानंबर प्लेटची कार कृष्णाघाट रस्त्यावरील एका वीटभट्टीजवळ आल्यानंतर पोलिसांनी त्या कारवर छापा टाकला.

कारची तपासणी केली असता त्यामध्ये ‘भारतीय बच्चो का बँक’ असा उल्लेख असलेल्या नोटांची 55 बंडल सापडले. परंतु बनावट नोटा ओळखून येऊ नयेत यासाठी त्या बंडलच्यावर पाचशे रुपयांच्या काही खर्‍या नोटा लावण्यात आल्या होत्या. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटेसारखे हुबेहुब दिसणारे ‘भारतीय बच्चों का बँक’ असा उल्लेख असलेल्या व त्यावर दोन हजार रुपये असा उल्लेख असलेले 45 बंडल मिळून आले. पोलिसांनी संशयितांंकडून बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

वरील तिघे कोणालातरी आर्थिक गंडा घालण्याच्या उद्देशाने बनावट नोटा घेऊन जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी तिघांकडून 3 लाख 56 हजार 170 रुपये किंमतीच्या बनावट नोटा, विना नंबर प्लेट कार आणि चार मोबाईल जप्त केले. त्यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न आणि मोटार वाहन कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करा ,गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे जिल्हा पोलिसांना निर्देश…

Next Post

महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ : पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासहित सात जणांवर गुन्हे दाखल : पोलीस मारहाणीत मनोरुग्ण मृत्यू प्रकरण..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ : पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासहित सात जणांवर गुन्हे दाखल : पोलीस मारहाणीत मनोरुग्ण मृत्यू प्रकरण..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group