• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली महानगरपालिकेचे बजेट 779 कोटींवर

Admin by Admin
June 7, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली महानगरपालिकेचे बजेट 779 कोटींवर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ; खबऱ्या प्रतिनिधी: महानगरपालिकेचे सन 2022-23 चे जमा-खर्चाचे मूळ अंदाजपत्रक 779 कोटी 90 लाखांवर गेले आहे. स्थायी समितीने सूचवलेल्या अंदाजापेक्षा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अंतिम केलेल्या अंदाजपत्रकात जमा बाजूला 37 कोटी रुपये वाढले आहेत.

महापालिकेच्या पदाधिकार्‍यांना 1.50 कोटी ते 6 कोटी, तर प्रत्येक नगरसेवकाला 40 लाख रुपये विकास निधीची तरतूद केली आहे.

महानगरपालिकेच्या दि. 30 मार्च 2022 रोजीच्या महासभेत सन 2021-22 चे सुधारित व सन 2022-23 चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी सादर केले होते. दरम्यान, नगरसेवकांच्या सूचनांचा विचार करून अंदाजपत्रक अंतिम करण्याचा अधिकार महासभेने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना दिला होता. निवडणूक वर्ष-सव्वावर्षावर आल्याने अंदाजपत्रक तातडीने अंतिम करून पुस्तिका तयार करा, अशी मागणी नगरसेवकांनी एकमुखी केली होती. दरम्यान, महापौर सूर्यवंशी यांनी सन 2022-23 चे मूळ अंदाजपत्रक अंतिम करून त्याची पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका सोमवारी महापालिकेतील सर्व पदाधिकार्‍यांना वितरीत करण्यात आली.

स्थायी समितीने महासभेकडे शिफारस केलेले जमा-खर्चाचे मूळ अंंदाजपत्रक 743 कोटी रुपयांचे होते. हे अंदाजपत्रक आता 779.90 कोटींवर गेले आहे. जमा बाजूला वाढीव 36.52 कोटी रुपये अंदाजित केले आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच नगररचना विभागाकडून वाढीव 6 कोटी अपेक्षित धरले आहेत. रस्ते खोदाईमुळे निर्माण झालेल्या चरींच्या दुरुस्तीसाठी 30 कोटीचा निधी अपेक्षित धरला आहे.

अंदाजपत्रकात महापौरांना विकास निधीसाठी 6 कोटी, उपमहापौर 3 कोटी, विरोधी पक्षनेता 3 कोटी, राष्ट्रवादीचे गटनेते 3 कोटी, सभागृह नेता 1.50 कोटी, स्थायी समिती सभापती 1.50 कोटी रुपये, प्रत्येक नगरसेवकाला 40 लाख रुपये, स्वीकृत पाच नगरसेवकांना एकूण 30 लाख 81 हजार रुपये तरतूद केली आहे.

या बाबींवर महापौरांनी वाढवलेली तरतूद

राजर्षि छत्रपती शाहू महाराज शताब्दी महोत्सव : 15 लाख रुपये
घनकचरा व्यवस्थापन : 5 कोटी मिरज, कुपवाड चिल्ड्रेन पार्क : 20 लाख
मुख्य रहदारीच्या चौकात डिजिटल सिग्नल उभारणे : 10 लाख रुपये
फॉगिंग मशिन : 50 लाख प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय : 49 लाख
गुणवत्तापूरक विकासासाठी वेगवेगळे सर्वेक्षण : 50 लाख
चौक सुशोभिकरण 20 लाख स्टेशनचौक विकास : 25 लाख
सांगलीत राजर्षि छत्रपती शाहू महाराज पुतळा : 25 लाख
कर्मचारी सांस्कृतिक भवन : 1 कोटी मिरज लक्ष्मी मार्केट : 45 लाख
महापालिका शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने सुधारणा करणे : 1.60 कोटी
सन 2020-21 मधील मंजूर कार्यादेशमधील विविध कामे : 3 कोटी
पाईपलाईन दुरुस्ती : 40 लाख, जलनि:सारण पाईपलाईन : 50 लाख

चर्‍या दुरुस्ती निधीच्या भरोशावर 30 कोटी जमेला

टेलिफोनच्या/मोबाईल कंपन्यांच्या केबलसाठी तसेच पाईपलाईनने घरगुती गॅस पुरवठ्यासाठी लाईन टाकल्या आहेत. त्यासाठी रस्ता खोदाई केलेला आहे. त्यामुळे रस्त्यावर चर्‍या पडल्या आहेत. या चर्‍यांच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिकेला 30 कोटींचा निधी येईल, या भरोशावर अंदाजपत्रकात 30 कोटी रुपये जमा बाजूला दाखवले आहेत.

Previous Post

तमाशाचे दिवस अन दिवसांचा तमाशा..

Next Post

कर्नाळ रस्त्यावर अनैतिक संबंधातून तरुणास भोसकले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेच्या वड्डीत ‘या’ फार्महाऊसवर छापा ; अंमली पदार्थाचा साठा जप्त..

कर्नाळ रस्त्यावर अनैतिक संबंधातून तरुणास भोसकले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group