• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कर्नाळ रस्त्यावर अनैतिक संबंधातून तरुणास भोसकले

Admin by Admin
June 7, 2022
in क्राईम
1 min read
0
मिरजेच्या वड्डीत ‘या’ फार्महाऊसवर छापा ; अंमली पदार्थाचा साठा जप्त..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ; खबऱ्या प्रतिनिधी : अनैतिक संबंधातून चंद्रकांत उत्तम हेगडे (वय 29, रा. नवीन वसाहत, टिंबर एरिया, सांगली) या तरुणास चाकूने भोसकण्यात आले. सांगली-कर्नाळ रस्त्यावर म्हसोबा मंदिरजवळ रविवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

हेगडे याला भोसकताच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अंधार असल्याने तो मृत होऊन पडला आहे, असा समज करून हल्लेखोर पसार झाले. ते जाताच हेगडेने रक्तबंबाळ अवस्थेत भीतीने स्वत: दुचाकीवरून एकटाच नांंद्रेपर्यंत प्रवास केला. तेथील दर्ग्याजवळ तो पडला. हा प्रकार पाहून काही ग्रामस्थ त्याच्या मदतीसाठी धावले. त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तो बचावला.

याप्रकरणी समीर नदाफ, अमित भिसे व अल्ताफ नदाफ (सर्व रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) या तीन हल्लेखोरांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चंद्रकांत हेगडे हा सोमवारी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.

संशयितांच्या शोधासाठी नांद्रे, मौजे डिग्रज, कर्नाळ, पद्माळे व वसडगे परिसरात छापे टाकण्यात आले. पण कोणाचा सुगावा लागला नाही. हेगडे हा गवंडी काम करतो. त्याच्या हाताखाली एक महिला कामाला होती. तिच्याशी त्याचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. त्यातून हेगडे व संशयितांचा वाद झाला होता. रविवारी रात्री संशयित समीर नदाफ व हेगडे हे दोघे मार्केट यार्डातील एका दुकानात दारु पिण्यासाठी बसले होते. तेथून त्यांनी कर्नाळ रस्त्यावर ढाब्यावर जेवायला जाण्याचे नियोजन केले.

दोघांकडेही दुचाकी होती. दोघे जेवायला गेले. कर्नाळ रस्त्यावर म्हसोबा मंदिरजवळ गेल्यानंतर नदाफने लघुशंकेचा बहाणा केला. तत्पूर्वी त्याचे दोन साथीदार अमित भिसे व अल्ताफ नदाफ हे अंधारात दबा धरुन बसले होते. या सर्वांनी हेगडेला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. नदाफने खिशातील चाकू काढून हेगडेच्या पोटात दोन वेळा भोसकले. काही क्षणातच हेगडे रस्त्यावर कोसळताच संशयितांनी पलायन केले. ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्यावेळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Previous Post

सांगली महानगरपालिकेचे बजेट 779 कोटींवर

Next Post

सांगलीत प्रज्वलित झाली अखंड शिवज्योत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत प्रज्वलित झाली अखंड शिवज्योत

सांगलीत प्रज्वलित झाली अखंड शिवज्योत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group