• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तमाशाचे दिवस अन दिवसांचा तमाशा..

विशेष : विजय चोरमारे(ज्येष्ठ पत्रकार)

Admin by Admin
June 6, 2022
in विशेष, शोध पत्रकारिता
1 min read
0
तमाशाचे दिवस अन दिवसांचा तमाशा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज जशी गावोगावी चौकाचौकात ऐश्वर्या, कतरिना, शाहरूख, सलमानची चर्चा चालते. तशीच चर्चा पूर्वी तमाशातल्या कलावंतांची व्हायची. काळू-बाळू, दत्ता महाडिक यांच्या विनोदाचे किस्से सैफ – सलमानच्या अफेअरच्या चवीनं चघळले जायचे. विठाबाई, कांताबाई म्हणजे माधुरी दीक्षित, ऐश्वर्या वगैरे. पारावरच्या गप्पांत, कुठल्या बैठकीत त्यांच्या अदाकारीच्या गप्पा तासन् तास रंगायच्या.

थंडी थड थड वाजायची. दात दातावर आपटायचे. अशा थंडीत उबदार वाकळेत घुरमटून झोपून जाण्याइतकं स्वर्गसुख दुसरं कुठलं नसायचं. पण लहानांचा असला आनंद हिरावून घेण्यात मोठ्यांना मोठा आनंद मिळत असतो. म्हणूनच सुखासुखी चांगली झोप लागली असतानाच शनिवारी भल्या सकाळी घरातलं कुणीतरी अंगावरची वाकळ खस्सकन ओढून काढतं आणि शाळेत जायचं नाही का म्हणून विचारतं. एरव्ही सकाळी दिवस कासराभर वर येईपर्यंत झोपायचं सुख मिळत असतं. कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री उठायचं म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षाच असते. भाताची मळणी काढायची असली की, असं मध्यरात्री नाहीतर पहाटे पहाटे उठावं लागायचं. आधी आईच्या हाका सुरू होत. मग आजोबांच्या. आणि नंतर वडिलांची लाथच बसे पेकाटात नाहीतर ढुंगणावर. मग उठावंच लागायचं. मळणीचा वैताग नको वाटायचा. भल्या पहाटे कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात खळ्यात जनावरांच्या मागं गोल गोल फिरा. मधेच एखादं जनावर शेण टाकायला लागलं तर त्यावर लक्ष ठेवा. शेण वरच्या वरच हातात धरा. शेण खाली पडता कामा नये. पडलं तर शिव्या खा. असली सगळी वैतागवाडी असायची मळणी म्हणजे. पण नाइलाज असायचा. भातकाढणी झाली की, दोन-पाच मळण्या निघायच्या. कधी रात्री उशीरा. कधी भल्या पहाटे. मळणीसाठी खळं मोकळं मिळेल तेव्हा जावंच लागायचं.

असल्या थंडीतही हाक येताच अंगावरची वाकळ फेकून खाड्कन उठण्याचेही काही प्रसंग असायचे. हे उठणं असायचं जत्रेतल्या तमाशासाठी. शेजारच्या गावात जत्रेत पारावरचा तमाशा यायचा. जत्रेनिमित्त गावकरी मोफत तमाशा ठेवत. त्यासाठी पंचक्रोशीतले लोक जमायचे. तमाशाचा पहिला खेळ जत्रेच्या आदल्या रात्री उशीरा म्हणजे मध्यरात्र उलटून गेल्यावर सुरू व्हायचा. तो उजाडेपर्यंत चालायचा. दुसरा खेळ दुपारी बाराच्या सुमारास वाजता सुरू व्हायचा, तो संध्याकाळी चार वाजेपर्यंत म्हणजे कुस्त्यांचं मैदान सुरु होईपर्यंत चालायचा.. फुकटच असायचा. असलं फुकटचं काही मनोरंजन चुकवायचं नाही, अशी साधारण कष्टकरी समाजाची धारणा असायची. नाहीतर बारा महिन्यांच्या राबणूकीत चार-सहा दिवसच असे भेटत. मनोरंजाची संधी देणारे. तीही फुकट. तिकीट काढून काही बघायचं म्हणजे कठिणच असायचं बापड्यांना. रुपया गाडीच्या चाकाएवढा भासायचा लोकांना. शेतात राबणाऱ्यांची सगळीकडं अशीच तऱ्हा. त्यामुळं जत्रेतला फुकटचा तमाशा म्हणजे पर्वणीच. आमच्यासाठीही. आम्हा पोरांनी सिनेमा,नाटक, तमाशाचा विचार करणंही वडिलांना मान्य नसायचं. भंगड लोकांचे धंदे असं म्हणायचे वडिल. अभ्यास करावा नेटका. शाळेत लक्ष द्यावं. पण आजोबांच्यामुळं तमाशाची संधी मिळायची. आणि आजोबांचाच पुढाकार असल्यामुळं वडिलांचं काही चालायचं नाही. आपण काही म्हटलं तरी फरक पडणार नाही म्हणून वडिल गप्प असायचे. पण पुढं कधीमधी चुका होतील, तेव्हा तमाशा गालावर नाहीतर पाठीवर खुणा उमटवायचा. पुढचं सगळं माहीत असूनही आजोबांची हाक आली की आम्ही उठायचो. तसल्या गारठ्यात थंडगार पाणी तोंडावर मारायचं. त्याशिवाय डोळ्यावरचं झोपेचं आवरण जायचं नाही. आम्ही तीन-चार भावंडं – एक चुलतभाऊ, दोन आतेभाऊ वगैरे तसल्या त्या थंडीत मध्यरात्रीच्या सुमारास आजोबांसोबत तीन-चार मैलांची पायपीट करायचो. ढोलकीचा आवाज नाहीतर लाऊडस्पीकरवरची गाणी कानावर यायला लागली की लक्षात यायचं, गाव जवळ आलंय.

जत्रेचा म्हणून एक वास असतो. गावात शिरताशिरता तो वास घुसायचा. मिठाईची पालं लागलेली असतात, तिथं चिरमुरे, चिवडा, गोडी शेव, बत्तासे वगैरेंची रेलचेल असायची. या सगळ्याचा मिळून एक विशिष्ट वास दरवळत असतो. तो जत्रेत नाहीतर एखाद्या मोठ्या गावाच्या आठवडा बाजारातच अनुभवायला मिळतो. पस्तीसेक वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा सगळीकडं लाइटही पोहोचली नव्हती. गॅस बत्त्यांच्या भगभगीत उजेडात जत्रा उजळून निघालेली असायची. इयत्ता दुसरीत असताना जत्रेतल्या पारावरच्या तमाशापासून तमाशाची ओळख झाली.

पौर्णिमेच्या चांदण्यानं वाट उजळून निघालेली असायची. रातकिडे किरकिरत असायचे. बाकी सगळी भयाण शांतता. वाट म्हणजे पायवाट. दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपं वाढलेली. त्यात काही खुसपूस झाली की अंगावर काटा मारायचा. सापांची भीती वाटायची. पायात चप्पल नसायचंच कुणाच्या. सगळे अनवाणी. थंडीत एखादा खडा बोचला की कळ मेंदूपर्यंत जायची. आजोबा झपाझप पावलं टाकीत पुढं चाललेले असायचे आणि आम्ही त्यांच्या मागनं. जास्त अंतर राहू नये याची काळजी घेत. अचानक जाळीतून एखादं भूत यायचं आणि मागच्या मागं झडप घालायचं अशी भीतीही वाटायची.

तमाशाच्या वाटेवरची म्हादू कुंभाराची गोष्ट कानावर होती. म्हादू कुंभार आणि त्याचा एक पाहुणा असे दोघेजण भल्या पहाटे चांदण्या रात्री तमाशाला निघाले होते. तंबाखू मळत, गप्पा मारत चालले होते. अंबरखान्याजवळ डोक्यावर घोंगडी आणि हातात काठी घेतलेल्या एका माणसानं त्यांना थांबवलं. पाहुणं तंबाखू आहे का म्हणून विचारलं. आपल्यासारखाच कुण्या गावचा पाव्हणा जत्रेला आला असावा असं त्यांना वाटलं. त्यांनी तंबाखू चुना दिला. बरंय… म्हणून तो पाहुणा निघाला. हेही पुढं निघाले. पाहुणा उलटा कुठं गेला म्हणून यांनी मागं वळून पाहिलं तर कुणीच नाही. दोघांच्याही काळचाचं पाणी पाणी झालं. पायात प्राण आणून जीव मुठीत घेऊन पळायला लागले. पायात मणामणाच्या बेड्या अडकवल्यासारखं झालं. दोघांचेही पाय उचलेना. तेवढ्यात मोठमोठ्यानं ओरडत एक गाढव त्यांच्यासमोरून ओरडत गेलं. पुन्हा पुन्हा ते गाढव समोरून ओरडत जावं लागलं. असं बराचवेळ चाललं म्हणे. अगदी गावाच्या शिवेवर पोहोचेपर्यंत.

भुताखेतांच्या गोष्टी निघतात तेव्हा म्हादू कुंभाराची ही गोष्ट हमखास सांगितली जायची. खरं काय खोटं काय हे जाणून घेण्याचं किंवा म्हादू कुंभाराला विचारून खातरजमा करून घेण्याचं आमचं वय नव्हतं. या गोष्टीचा पगडा मनावर होता. त्यामुळं सगळ्यांनी गठ्ठ्यानं चालायचं. एकट्या-दुकट्यानं मागं राहायचं नाही किंवा पुढं जायचं नाही हे न बोलता ठरलेलं असायचं. अंबरखान्यातून पुढं जाताना तर एकमेकांच्या हातात हात घेऊनच चालायचं. भुतांमधला सगळ्यात पॉवरफुल्ल प्रकार म्हणून खविसाची भीती घातली जाते. खविसाने कधी कसं कुणाला कुठं अडवलं, कोण कुस्ती खेळलं, कुणी कुणाला लोळवलं याच्या गोष्टीही गावच्या कट्ट्यावर रंगायच्या. आमचे आबा म्हणजे वल्ली होती. खवीस समोर आला असता तरी त्याला कानफाटीत मारून पुढं गेले असते. त्यांना कशाची म्हणून कधी भीती वाटली नाही. रात्री अपरात्री कंदिल घेऊन एकटेच शेतावर फेरी मारून यायचे. ते कधी कुठल्या देवळात गेल्याचंही पाहण्यात आलं नाही. घरात गणपती असला तरी त्यांनी कधी गणपतीला नमस्कार केला किंवा त्याची सेवा केली, असंही कधी नाही. तमाशाला जाताना आबा पुढं झपझप चाललेले असायचे.

गावात पोहोचल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मेवामिठाईची पालं लागलेली असायची. अजून उजाडलेलं नसल्यामुळं बरीचशी मरगळलेली असायची. चार-दोन ठिकाणीच गॅसबत्त्या भगभगत असायच्या. पुढं पारावर गॅस बत्तीच्या उजेडात तमाशाची गणगौळण सुरू झालेली असायची. कृष्णानं गौळणींची वाट अडवलेली असायची. मावशी वाक्यावाक्याला कृष्णाची खेचत असायची. सगळं पब्लिक हसून हसून आडवं व्हायचं. कुणाला वाटायचं नाही की देवादिकांचा अवमान होतोय म्हणून. भोळ्याभाबड्या तमासगीरांनी देवांचं मानवीकरण केलेलं असायचं. खरंतर देव अशाच मानवीकरणात राहिले असते तर नंतरच्या काळात देशातल्या कितीतरी धार्मिक दंगलीच घडल्या नसत्या, असं आज वाटतं. धर्माची दुकानदारी करणाऱ्यांनी देवाला माणसापासून तोडून दूर नेलं, असंही वाटतं.
तमाशाच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकात मोठी स्थित्यंतरं झाली. पारावरचा तमाशा लयाला गेला. मोठ्या तंबूतल्या तमाशाची स्थितीही फारशी समाधानकारक राहिलेली नाही. तमाशांनी तमाशाचा बाज हरवलाच, पण काळाची पावलं ओळखून बदलही केले नाहीत. मूळच्या तमाशातल्या गोष्टी उचलून सिनेमा आणि नाटकांनी आपली श्रीमंती वाढवली. परंतु तमाशा करणाऱ्यांनाच आपली बलस्थानं न कळल्यामुळं ते सिनेमातल्या गाण्यांची भ्रष्ट नक्कल करून कंगाल बनत गेले.

पठ्ठे बापूराव सगळ्यांना माहीत आहेत, पण सावळजचे उमा-बाबू सावळजकर, तात्या सावळजकर, कौलग्याचा सत्यप्पा, बनपुरीचे आवजी कृष्णा, कवलापूरचे शिवा-संभा, बाबू कुपवाडकर, बेनापूरचा दादू, किवळ्याचे रामा-नामा, शिरगावचे नाथा पाटील, इचलकरंजीचे हरिभाऊ साळी या तमासगिरांनी काळ गाजवला. भाऊ मांग नारायणगावकर, विठाबाई नारायणगावकर, कांताबाई सातारकर, दत्ता महाडिक, गुलाबराव बोरगावकर, काळू-बाळू, गणपत माने चिंचणीकर, यांची पिढी मागे पडल्यानंतर त्यांची जागा घेणारं कुणी पुढं आलं नाही. मंगला बनसोडे, रघुवीर खेडकरांनी काळ गाजवला पण आज त्यांचाही प्रभाव राहिलेला नाही. महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्लॅमर अनुभवलं, ते तमाशा कलावंतांनीच. आज जशी गावोगावी चौकाचौकात ऐश्वर्या, कतरिना, शाहरूख, सलमानची चर्चा चालते. तशीच चर्चा पूर्वी तमाशातल्या कलावंतांची व्हायची. काळू-बाळू, दत्ता महाडिक यांच्या विनोदाचे किस्से सैफ – सलमानच्या अफेअरच्या चवीनं चघळले जायचे. विठाबाई, कांताबाई म्हणजे माधुरी दीक्षित, ऐश्वर्या वगैरे. पारावरच्या गप्पांत, कुठल्या बैठकीत त्यांच्या अदाकारीच्या गप्पा तासन् तास रंगायच्या. विठाबाईंचा नाच, भाऊ मांग यांच्याबरोबरची त्यांची स्टोरी. तमाशात नाचणाऱ्या विठाबाईंच्या मुलींपैकी धाकटी कुठली आणि थोरली कुठली ? कुठला तमाशा एक नंबरला आहे आणि कुठला दोन नंबर ? हेच चर्चेचे विषय असायचे. पण हाही काळ मागे पडला.

तमाशाचे दिवस मागे पडले. मूळचा तमाशाही हरवला. आज माणसांच्या जगण्याचाच तमाशा होऊन बसलाय.

Previous Post

कोयना एक्सप्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल..

Next Post

सांगली महानगरपालिकेचे बजेट 779 कोटींवर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली महानगरपालिकेचे बजेट 779 कोटींवर

सांगली महानगरपालिकेचे बजेट 779 कोटींवर

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group