• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर : परप्रांतीयांनी ओढला रंकाळा चौपाटीवर हुक्का

Admin by Admin
June 6, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोल्हापूर : परप्रांतीयांनी ओढला रंकाळा चौपाटीवर हुक्का
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : खबऱ्या प्रतिनिधी ; शहराचे वैभव आणि शहराच्या सौंदर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रंकाळ्यावर काल काही परप्रांतीय तरुणांनी खुलेआमपणे हुक्का पार्टी केली. तिथे आलेल्या पर्यटकांची किंवा शहरवासीयांची तमा न बाळगता हे तरुण हुक्का ओढत राहिले.

त्यामुळे अशा परप्रांतीयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरात अंबाबाई मंदिरासह सर्वच पर्यटस्थळांना भेट देण्यासाठी रोज लाखो लोक कोल्हापूरमध्ये येतात. आल्यावर ते रंकाळा चौपाटीवर फेरफटका मारतात. काल (ता. ४) रंकाळ्यावर मोठी गर्दी होती. स्थानिकांसह इतर जिल्ह्यांतील आणि राज्यातील लोकही येथे आले होते. मात्र, कामानिमित्त कोल्हापुरात असणारे काही परप्रांतीय तरुणांनी चौपाटीवर हुक्का पेटविला आणि हुक्‍क्‍याची नळी तोंडाला लावून धुराचे लोट सोडू लागले.

हा सर्व प्रकार तिथे असणारे नागरिक पाहत होते. फोनवर कोणाशी तरी बोलणे, जोर-जोराने हसणे हे प्रकार सुरूच राहिले. स्थानिक लोकांनी त्यांचे फोटोही काढले. ते सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. शहरात आणि रंकाळा चौपाटीवरच हुक्का पार्टी करणारे तरुण पाहून अनेकांना धक्का बसला. कोणीतरी बाहेरचे लोक येतात आणि कोल्हापूर शहरातील सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात, अशांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

हुक्का ओढणाऱ्यांवर तत्काळ आणि कडक कारवाई केली जाईल. असे हुक्का ओढणारे दिसल्यास ११२ नंबरवर तत्काळ माहिती द्यावी.

– शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर

Previous Post

सांगली : शिक्षक बँकेसाठी रण तापले..

Next Post

कोयना एक्सप्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोयना एक्सप्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल..

कोयना एक्सप्रेस विजेवर धावली, १५ मिनिटे आधी मिरजेत दाखल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group