• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : शिक्षक बँकेसाठी रण तापले..

Admin by Admin
June 6, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक
1 min read
0
सांगली : शिक्षक बँकेसाठी रण तापले..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे निवडणुकीचे रण तापू लागले आहे. २१ जागांसाठी १३६ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. सत्ताधारी शिक्षक समितीला आव्हान देण्यासाठी शिक्षक संघाचे संभाजी थोरात गट तसेच शि.द. पाटील गट आणि इतर काही संघटना स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. दोघांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक ३ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून छाननी अखेर २१ जागांसाठी १३६ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. २० जूनपर्यंत उमेदवारी माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, शिक्षक समितीच्या गेल्या अकरा वर्षातील सत्तेला उलथवून टाकण्यासाठी विविध संघटनानी एकत्र येऊन स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या माध्यमातून आव्हान दिले आहे.

आरोप-प्रत्यारोपांची राळ…

शिक्षक बँकेची निवडणूक गेल्या महिन्यात जाहीर झाली असली तरी दोन महिन्यापूर्वी पासूनच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरलेल्या शिक्षक समितीने पुन्हा एकदा बँकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. फेब्रुवारीत शिक्षक समितीने बँकेचे कर्जाचे व्याजदर कमी केले होते. त्यानंतर काही कारणावरून व्याजदर एक अंकी करून सभासदांना खूश करण्याचा प्रयत्न केला. सात वर्षात सहा वेळा व्याजदरात कपात केल्याचा दावा समितीने केला होता. त्याचवेळी लाभांश वाढवत नेल्याचा दावा केला आहे.

तर शिक्षक संघाने मात्र त्यांच्या काळात केवळ व्याज वाढवल्याचा आरोपही केला होता. दुसरीकडे शिक्षक संघाने समितीचे आरोप खोडून काढत गेल्या अकरा वर्षे शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर व्याजदरात कपात आणि उच्चांकी लाभांशाची घोषणा केली आहे. मात्र या गोष्टी म्हणजे निव्वळ सभासदांची फसवणूक असल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे. संगणक देखभाल दुरुस्ती, नोकर भरती, पोलीस पगार यावर सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची उधळण केल्याचा आरोपही शिक्षक संघाने केला होता.

Previous Post

मालगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

Next Post

कोल्हापूर : परप्रांतीयांनी ओढला रंकाळा चौपाटीवर हुक्का

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापूर : परप्रांतीयांनी ओढला रंकाळा चौपाटीवर हुक्का

कोल्हापूर : परप्रांतीयांनी ओढला रंकाळा चौपाटीवर हुक्का

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group