• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हातकणंगलेत अडीच वर्षाच्या बाळाचा विक्रीचा प्रयत्न ; पाच जणांना अटक

Admin by Admin
June 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हातकणंगले : खबऱ्या प्रतिनिधी ; हातकणंगले बसस्थानक परिसरात अडिच वर्षाच्या बाळाच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना हातकणंगले पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

तर यातील एक जण फरार झाला आहे. संतोष पुरी, शिवपुरी गोस्वामी (40, रा. बेकाराई तालुका सारडा जिल्हा भीलवाडा राज्य राजस्थान), दिनेश नंदलाल बनभैरू (36, रा. लाडा प्लॉट अकोला नाका वाशिम जिल्हा), कुसुमबाई देविदास गायकवाड (40, रा. राहुल नगर नांदेड), लक्ष्मी आदेश खरे (40, तेरा नगर नांदेड), ललिता भिसे (रा. कोरोची तालुका हातकणंगले) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पकडले

हातकणंगले येथील बसस्थानकात अडिच वर्षाच्या बालकाच्या विक्रीसाठी काही लोक येणार असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बाळाच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संतोष पुरी, शिवपुरी गोस्वामी, दिनेश नंदलाल बनभैरू, कुसुमबाई देविदास गायकवाड, लक्ष्मी आदेश खरे, ललिता भिसे यांना त्यांच्या ताब्यातील लहान बाळासह ताब्यात घेण्यात आले. संबंधित बाळास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यातील आणखी एक आरोपी महेश चौधरी राहणार नांदेड हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
तसेच यातील लहान बाळाबाबत कोणाला काही माहिती असल्सया त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

Previous Post

पडळकरांची जीभ पुन्हा घसरली ; शरद पवार यांच्याबाबतीत म्हणाले…

Next Post

कडेगांव तालुक्यात लागेल ती मदत देऊ : प्रा.नितीन बानुगडे पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगांव तालुक्यात लागेल ती मदत देऊ : प्रा.नितीन बानुगडे पाटील

कडेगांव तालुक्यात लागेल ती मदत देऊ : प्रा.नितीन बानुगडे पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group