• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगांव तालुक्यात लागेल ती मदत देऊ : प्रा.नितीन बानुगडे पाटील

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर..

Admin by Admin
June 6, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कडेगांव तालुक्यात लागेल ती मदत देऊ : प्रा.नितीन बानुगडे पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:-सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि या सरकारने सर्वसामान्य शेतकरी आपला केंद्रबिंदू मानून कारभार सुरू ठेवला आहे.सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत २ लाखांपर्यंतची कर्ज माफी कोणत्याही अटी विना जाहीर केली आणि दिली तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यात येणार आहे त्याची कार्यवाही सुद्धा सुरू झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण मदत केली जाईल असे प्रतिपादन शिवसेना उपनेते मा नितीनजी बानुगडे पाटील यांनी केले.

शेत तळ्याचे श्रीफळ वाढवून अनावरण करताना मा प्रा नितीन बानूगडे पाटील

प्रा बानूगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांच्या प्रयत्नातून तर शिवसेनेच्या माध्यमातून युवा शिवसैनिक प्रदिप कदम यांच्या पाठपुराव्यातून कडेगाव तालुक्यात अनेक शासकीय योजनांचे प्रबोधन आणि शेतक-यांना लाभ मिळवून देण्याची अंमलबजावणी सुरू आहे. नेवरी येथील प्रगतशील शेतकरी प्रदिप कचरे यांना शेततळे देण्यात आले,यावेळी कचरे यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी प्रा बानूगडे पाटील बोलत होते.

यावेळी प्रा. बानुगडे पाटील,जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी युवा नेते प्रदिप कदम यांचे कामाचे कौतुक केले आणि श्रीफळ वाढवून शेत तळ्याचे अनावरण केले,यावेळी बोलताना प्रा.बानुगडे पाटील यांनी कडेगांव तालुक्यात कृषी शेततळे ,मागेल त्याला शेती विद्युत पुरवठा अश्या अनेक शासनाच्या योजना राबवू असे आश्वासन दिले व शेतकरी प्रदिप कचरे आणि परिवाराचे उत्कृष्ट शेती नियोजन पाहून अभिनंदन केले.

शेतकऱ्यांकडून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांचा सत्कार

यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते,प्रदिप कदम,कृषी अधिकारी अविनाश आढाव, संदीप भोये,युवासेना जिल्हाधिकारी मिलिंद कदम, रोहन जाधव,विनायक कचरे, धनाजी मंडले,विक्रम कदम, सोमनाथ फंडतरे, आण्णा ढवळे, संकेत ढवळे,विजय हत्तरकाळ, फिरोज मुल्ला,विठ्ठल ढवळे, दिवाकर रावताळे शिवराज ढवळे, सौ.जनाबाई कचरे आदीसह पदाधिकारी मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous Post

हातकणंगलेत अडीच वर्षाच्या बाळाचा विक्रीचा प्रयत्न ; पाच जणांना अटक

Next Post

इस्लामपुरात ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इस्लामपुरात ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार

इस्लामपुरात ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group