• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या ‘मार्शल’ श्वानाचे निधन

Admin by Admin
June 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या ‘मार्शल’ श्वानाचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील अनेक मंत्री तसेच महाराष्ट्रातील देवस्थानांच्या प्रमुख यात्रांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षाकवच म्हणून पोलीस दलात आठ वर्षे राबलेल्या ‘मार्शल’ (वय १४) या श्वानाने निवृत्तीकाळात रविवारी अखेरचा श्वास घेतला. सांगलीवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगलीतील ‘बॉम्बशोधक व घातपातविरोधी पथका’त मार्शलने तब्बल आठ वर्षे सेवा बजावली होती. त्याचा जन्म २५ मे २००९ रोजी झाला होता. २०१० मध्ये पुण्यात प्रशिक्षण पूर्ण करुन तो सांगलीच्या पोलीस दलात दाखल झाला होता. चणाक्ष बुद्धीच्या मार्शलने अल्पावधित पोलीस दलात लोकप्रियता मिळवली. पोलीस अधिकाऱ्यांनीही अनेकदा या श्वानाचे कौतुक केले. २०१० ते २०१८ या कालावधित त्याने पोलीस दलासह, लोकप्रतिनिधी व नागरिकांची सेवा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगली दौऱ्यावेळी घातपातविरोधी तपासणीचे काम याच श्वानाने केले होते. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या दौऱ्यातील सुरक्षा कमानही अनेक वर्षे त्याने सांभाळली. नाशिकचा कुंभमेळा, पंढरपुरातील आषाढी, कार्तिकी यात्रा, तुळजापुरातील नवरात्रोत्सव अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या सुरक्षेचा भार मार्शलने पेलला होता. सांगलीतील पंचायतन गणपती मंदिरापासून येथील अनेक उत्सवातही त्याने घातपातविरोधी सुरक्षेची सेवा दिली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये त्याच्या बुद्धीची चाचणी घेण्यात आल्यानंतर दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा गौरवही केला होता. संजय कोळी, समीर सनदी, संतोष माळी या तीन हँडलरकडे तो आठ वर्षे सेवेत होता.

Previous Post

सांगली : कॉलेज युवतीस जीवे मारण्याची धमकी

Next Post

दरोड्याच्या गुन्ह्यात सोनारानं साथ देऊन पार पाडली चोख भूमिका , उंब्रज पोलिसांचा १३ जणांना ‘मोक्का’ लावून २४ कॅरेटचा झटका..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दरोड्याच्या गुन्ह्यात सोनारानं साथ देऊन पार पाडली चोख भूमिका , उंब्रज पोलिसांचा १३ जणांना ‘मोक्का’ लावून २४ कॅरेटचा झटका..?

दरोड्याच्या गुन्ह्यात सोनारानं साथ देऊन पार पाडली चोख भूमिका , उंब्रज पोलिसांचा १३ जणांना 'मोक्का' लावून २४ कॅरेटचा झटका..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group