• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : कॉलेज युवतीस जीवे मारण्याची धमकी

Admin by Admin
June 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे ‘बळ’..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी;
येथे एका महाविद्यालयात शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेम करण्याची जबरदस्ती करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा त्रास रोडरोमिओकडून एक वर्षे सुरू होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्रास देणार्‍या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. उमर सलीम महात (वय 20) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह शहरात राहते. सांगलीतीलच एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. गेल्या एक वर्षापासून संशयित उमर हा तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याच्या भीतीपोटी पीडित तरुणीने घरी काही सांगितले नाही. दि. 2 जूनरोजी पीडित मुलगी ही कामानिमित्त निघाली होती. यावेळी संशयित महात याने जे. पी. ग्रुप चौक येथे पीडितेला रस्त्यावर अडविले. ‘माझ्यावर प्रेम करतेस की नाही, असे म्हणत धमकावू लागला. पीडितेने त्याला विरोध केल्यानंतर ‘तुझे दुसर्‍यासोबत लग्न ठरल्यास तुला ठार मारून टाकीन, अशी धमकी त्याने यावेळी दिली. यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने कुटुंबियांना सांगितला. पीडितेच्या आईने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित उमर महात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने उमर याला अटक केली आहे.

Previous Post

सांगली | शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पोलिसालाच केली मारहाण…

Next Post

सांगली : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या ‘मार्शल’ श्वानाचे निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या ‘मार्शल’ श्वानाचे निधन

सांगली : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या 'मार्शल' श्वानाचे निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group