• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दरोड्याच्या गुन्ह्यात सोनारानं साथ देऊन पार पाडली चोख भूमिका , उंब्रज पोलिसांचा १३ जणांना ‘मोक्का’ लावून २४ कॅरेटचा झटका..?

Admin by Admin
June 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दरोड्याच्या गुन्ह्यात सोनारानं साथ देऊन पार पाडली चोख भूमिका , उंब्रज पोलिसांचा १३ जणांना ‘मोक्का’ लावून २४ कॅरेटचा झटका..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कराड : खबऱ्या प्रतिनिधी; जिल्ह्यातील वडूज,औंध, उंब्रज पोलिस ठाण्यात, तसेच पुणे, बीड, नगर आदी ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 13 जणांवर सातारा पोलिसांनी मोक्का लावला आहे.

कराड तालुक्यातील मसूर येथील घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या या टोळीविरोधात पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मोकांतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती. या प्रस्तावास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मान्यता दिली.उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे सातारा पोलीस दलाची उंची अजून वाढली आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आणि उत्तमरीत्या तपास करण्यात पोलीस अधिकारी गोरड अग्रेसर आहेत.

मार्च महिन्यात मसूर येथे सशस्त्र दरोडा पडला होता. संशयितांनी घराचे दार उचकटून आत प्रवेश करत शस्त्राने घरात असणाऱ्या मारहाण करत सोन्या- चांदीचे दागिने लुटले होते. या प्रकरणाचा तपास उंब्रज, तसेच स्थानिक गुन्हे शाखेने करत आष्टी (बीड) येथील काही संशयितांना पकडले होते. पकडलेल्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर लुटलेला ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. पकडलेल्या संशयितांची टोळी असून, त्यांच्यावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले.

यामध्ये होमराज ऊर्फ होम्या उद्धव काळे, अतुल लायलन भोसले, धल्ल्या अक धर्मेंद्र ननशा काळे, कानिफनाथ उद्धव काळे, सुनीता होमराज काळे (सर्व रा. वाकी शिवार, आष्टी), अजय ऊर्फ आज्या सुभाष भोसले, सचिन ऊर्फ आसी सुभाष भोसले, अविनाश ऊर्फ आवी सुभाष भोसले, रुस्तुमबाई सुभाष भोसले, गणेश ऊर्फ बन्सी रंगिशा काळे (सर्व रा. माही जळगाव, कर्जत), राहुल ऊर्फ काळ्या पद् भोसले (रा. वाळूज पारगाव, पाथर्डी), संतोष विनायक पंडित, नीलेश संतोष पंडित (रा..आरणगाव, नगर) यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

सांगली : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या ‘मार्शल’ श्वानाचे निधन

Next Post

कोरोना वाढल्याने यंदाही शाळा बंद राहणार..? शिक्षणमंत्र्यांकडून महत्वाचे संकेत..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

कोरोना वाढल्याने यंदाही शाळा बंद राहणार..? शिक्षणमंत्र्यांकडून महत्वाचे संकेत..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group