• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्ह्यात खळबळ | खून..! विठुरायाचीवाडीत डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून..; जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली : नागरिक असुरक्षित.?

Admin by Admin
June 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कवठेमहांकाळ :खबऱ्या प्रतिनिधी : विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे तरुणाचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. बनाप्पा बाळासाहेब म्हार्नुर (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली.

बनाप्पा म्हार्नुर हा गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबला होता. त्यानंतर त्याला काही नागरिकांनी सकाळी अकरा वाजता त्या हॉटेलच्या पाठीमागे बंद पडलेल्या मिलजवळ पाहिले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बनाप्पा हा त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून मारेकऱ्यांनी तोंडाचा चेंदामेंदा केला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ एक गुलाबाचे फूलही आढळून आले आहे.

बनाप्पाचा खून हा गॅंगवार किंवा पूर्ववैमनस्यातून केला असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मारेकऱ्यांनी प्लॅन करून बनाप्पाचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पाच दिवसात तीसरा खून

नजरेला नजर मिळवणे आणि कोणाला मोठ्या आवाजात बोलले तरीही आता थेट त्याचा ‘गेम’ केला जात आहे. खून, खुनी हल्ल्याच्या घटनांनी जिल्हा पुरता हादरला आहे. पाच दिवसात सांगली शहरात दोन खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Previous Post

बदल्यांना ब्रेक; पदोन्नतीची प्रक्रिया सुसाट..!

Next Post

मिरज | निकृष्ट रस्तेप्रश्नी मनसे करणार खळखट्याक..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला भाजपची ऑफर , ‘या’ आमदाराला पाडण्यासाठी राजकारण..?

मिरज | निकृष्ट रस्तेप्रश्नी मनसे करणार खळखट्याक..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group