• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत मटक्याच्या हप्त्यासाठी “दादा” गिरी..! मटका घ्यायचा असल्यास पाच हजार हप्ता दे!

Admin by Admin
June 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : मटक्याचा व्यवसाय व्यवस्थित चालवायचा असेल तर पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करून कोयत्याने धमकाविण्याचा प्रकार मिरजेत घडला.

याप्रकरणी मोहीन जाफर बानदार (रा. गुरुवारपेठ, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली. याबाबत शमशुद्दीन दादापीर कोतवाल यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

शुमशुद्दीन कोतवाल यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हलसचा व्यवसाय आहे. दि. 29 मे रोजी मोहीन बानदार याने त्यांना फोन करून एक हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळी कोतवाल यांनी हजार रुपये देण्यास नकार दिला होता. पैसे देण्यास नकार दिल्याने बानदार हा दि. 30 मे रोजी सायंकाळी कोयता घेवून कोतवाल यांच्या घरात गेला. त्यावेळी त्याने कोतवाल यांच्याकडे तातडीने पाच हजार रुपये देण्याची मागणी केली.

पैसे मागितल्यानंतर कोतवाल यांनी बानदार याला “मी तुला पाच हजार रुपये कशासाठी देऊ “, अशी विचारणा केली. त्यावेळी बानदार याने “तुझा मटक्याचा धंदा आहे, तो व्यवस्थित चालवायचा असल्यास मला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल”, असे म्हणून त्यांच्या अंगावर कोयता घेवून धावून गेला. त्याचवेळी त्या परिसरात पोलिस आल्याचे पाहून बानदार याने तेथून हत्यारासह मोटारसायकलवरुन पलायन केले होते. धमकी देऊन पाच हजार रुपयांचा हप्ता मागितल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी मोहीन बानदार याला अटक केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

मिरज | ‘या ‘आमदाराला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज, यासाठी आम्ही उचलून नेऊ ,गुन्हा दाखल करा -किरणसिंह राजपूत आक्रमक..

Next Post

बदल्यांना ब्रेक; पदोन्नतीची प्रक्रिया सुसाट..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बदल्यांना ब्रेक; पदोन्नतीची प्रक्रिया सुसाट..!

बदल्यांना ब्रेक; पदोन्नतीची प्रक्रिया सुसाट..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group