• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | ‘या ‘आमदाराला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज, यासाठी आम्ही उचलून नेऊ ,गुन्हा दाखल करा -किरणसिंह राजपूत आक्रमक..

शिवसैनिकांची भावना दुखावली गेल्याचा किरणसिंह राजपूत यांचा आरोप..

Admin by Admin
June 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
आम्हाला डावलले जाते ; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही काँग्रेसबाबत तक्रार…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरजेत शिवसेना शहर संघटक किरण रजपूत यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, शिवसेना मिरज शहर संघटक किरण रजपूत यांनी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळेस त्यांच्यासोबत गजानन मोरे व शिवसैनिक उपस्थित होते.

सोमवारी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयात उपस्थिती दर्शविणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती, यावेळी स्टेजवर शिवसेनेचे मिरज शहर संघटक किरणसिंग रजपूत हे उपस्थित होते, टीका सुरू झाल्यावर कट्टर आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जाणाऱ्या किरण रजपूत यांनी स्टेजवरून खाली उतरून काढता पाय घेतला.

एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्याठिकाणीच उत्तर देऊ शकलो असतो. मात्र,निरंजन आवटी आमचे चांगले मित्र आहेत,त्यांच्या कार्यक्रमात कोणताही खंड नको म्हणून स्टेज सोडला असल्याचे किरण रजपूत यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या भाषणाने आमच्या भावना दुखावल्या गेल्या तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोण टीका करत असतील तर आम्ही शिवसैनिक म्हणून खपवून घेणार नसल्याचे किरण रजपूत यांनी सांगितले. तर आमदार नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे किरणसिंग रजपूत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणे अत्यंत गरजेचं आहे. ते स्वतः दाखल झाले नाहीत तर आम्ही त्यांना उचलून ट्रीटमेंट साठी हॉस्पिटलमध्ये दाखल करू असा इशारा किरणसिंग रजपूत यांनी दिला आहे.

Previous Post

बापाच्या खूनप्रकरणी मुलाला पोलिस कोठडी

Next Post

मिरजेत मटक्याच्या हप्त्यासाठी “दादा” गिरी..! मटका घ्यायचा असल्यास पाच हजार हप्ता दे!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…

मिरजेत मटक्याच्या हप्त्यासाठी "दादा" गिरी..! मटका घ्यायचा असल्यास पाच हजार हप्ता दे!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group