• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महापालिकेच्या उपक्रमांची विधीमंडळ समितीवर छाप..!मिरजेत मात्र महिलांकडून आयुक्तांसहित नगरसेवकांना शाप..?

मिरजेत दाखवण्यासारखं काय.? घाणेरड्या मुताऱ्या अन कामासाठी रोजच्या वाऱ्या..?

Admin by Admin
June 2, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी : विधानमंडळ महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीसमोर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले खरे.परंतु, सांगली शहर दाखवले म्हणजे ‘A ग्रेड’ मिळेल असे नाही .या भुरट्या विकासकामांचा पोलखोल हा विधानमंडळ महिला व बाल कल्याण विभागासमोर आम्ही करणार आहोत, असा निर्णय “गोपनीय खबऱ्या वृत्तसंस्थेने” घेतला आहे.

सांगलीत महापालिकेने उभारलेले चिल्ड्रेन पार्क, मध्यवर्ती निदान केंद्र, मॉडेल स्वच्छतादूत निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अभ्यासिकेची समितीने पाहणी केली. महानगरपालिकेच्या या उपक्रमांची व सादरीकरणाची समितीवर चांगली छाप पडली.परंतु , मिरजेत ही समिती आली असती तर अक्षरशः आयुक्तांसहित लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाची पळता भुई थोडी झाली असती..?

आमदार सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखालील विधानमंडळाच्या समितीचा दौरा बुधवारी सुरू झाला. दुपारी या समितीने जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयांच्या संबंधित विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतली. महिला व बालविकास योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरे झाली. विधानमंडळाच्या या समितीच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार मनीषा कायंदे, आमदार लता सोनवणे व समिती सदस्यांनी आढावा घेतला. ही समिती आली आहे, येणार आहे याची कल्पना पत्रकारांना सुद्धा देण्यात न आल्याने प्रसिद्धी माध्यमं आता याचा पोलखोल करतील हे निश्चित..!

सांगलीत दिव्यांगांसाठी उद्यान..!अन मिरजेत महिलांना प्रसाधनगृह नाही..

विधानमंडळ समितीने महानगरपालिकेच्या मॉडेल स्वच्छतादूत निवारा केंद्राची पाहणी केली. सांगलीत चिल्ड्रेन पार्कचे कौतुक केले. बालकांच्या मनोरजंनाबरोबर त्यांच्या सुरक्षिततेसाठी मैदानात सर्वत्र समुद्राची रेती टाकल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. लहान मुले खेळताना पडली तरी रेतीमुळे त्यांना इजा होणार नसल्याने समाधान व्यक्त केले. दरम्यान दिव्यांगांसाठी उद्यान विकसित करण्याची सूचना समितीने महापालिकेला केली.मिरजेत मात्र भाजी विक्रेत्या महिला , महाविद्यालयीन तरुणी किंवा कामानिमित्त शहरात येणाऱ्या स्त्रियांना प्रसाधन गृह नाही, महिला स्वच्छतागृह असूनही त्याच्या आजूबाजूला हातगाड्या, टू व्हीलर गाड्यांच्या पार्किंग मुळे ,पुरुष असल्यामुळे महिलांना अडचण ठरत आहे.

आपत्ती व्यवस्थापन केंद्रात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने या केंद्रातून महापूर आपत्ती नियंत्रण करणे सुलभ होणार असल्याचे मतही समिती सदस्यांनी व्यक्त केले. महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राबद्दलही समितीने गौरवोद्गार काढले.

समितीला आवडली ‘यलो सिटी’ संकल्पना , मिरजेत दिसला असता आळशीपणा..!

हळदीने सांगलीचे नाव जगभर केले आहे. सांगलीच्या हळदीची ही जुनी परंपरा, चांगला वारसा जतन करण्यासाठी महानगरपालिकेने ‘सांगली यलो सिटी’ ही संकल्पना पुढे आणली आहे. शहरातील इमारती पिवळ्या रंगात झळाळणार आहेत. ‘यलो सिटी’ची माहिती आयुक्त कापडणीस यांनी समितीसमोर मांडली. नवीन व चांगली संकल्पना असल्याचे समितीने म्हटले. परंतु, मिरजेत ही समिती आली असती तर त्यांना महापालिका प्रशासनाचा केवळ आळशीपणाच दिसला असता. या समितीने महापालिकेचा ‘मोठेपणा’ सांगणाऱ्याच्या सोबत संवाद न साधता, महापालिकेचा ‘खोटेपणा’ सांगणाऱ्या सर्वसामान्य महिला वर्गाशी संवाद साधणे गरजेचं होतं.

Previous Post

सांगली | फार्महाऊसवर छापा टाकून कारवाई केल्याची नुसतीच ‘बोंब’..? ‘मुख्य आरोपीला’ सवलत देणाऱ्यांच्या कामगिरीवर संशयाचे ‘कोंब’.?

Next Post

आपत्तीच्या मुकाबल्यासाठी ‘एनडीआरएफ’कडून प्रशिक्षण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आपत्तीच्या मुकाबल्यासाठी ‘एनडीआरएफ’कडून प्रशिक्षण

आपत्तीच्या मुकाबल्यासाठी 'एनडीआरएफ'कडून प्रशिक्षण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group