• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साप्ताहिक राशिभविष्य (२९ मे ते ४ जून २०२२)

Admin by Admin
May 29, 2022
in विशेष, सामाजिक
1 min read
0
साप्ताहिक राशिभविष्य (२९ मे ते ४ जून २०२२)
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शरीरविज्ञान आणि मनोविज्ञान यांची सांगड घालत अर्थातच आचार, विचार आणि उच्चार यांचा संदर्भ घेत माणसाच्या तथाकथित जीवनाचं मूल्यमापन म्हणा किंवा चक्क रोगनिदान म्हणा, करणारा माणूस सध्याच्या कलियुगात स्वतः घोर अज्ञानात वावरत असूनही, ‘मला शहाणपणा शिकवू नकोस,’ मला असाच अज्ञानात राहू दे, असंच सतत म्हणत असतो! म्हणूनच समर्थांना दासबोधात मूर्ख लक्षणाचा समास लिहावा लागला! असो.

व्यावसायिक वसुली होईल

मेष : सप्ताहारंभीच्या अमावास्येच्या प्रभावक्षेत्राखाली भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी कौटुंबिक वाद टाळावेत. बाकी सप्ताह अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येनंतर आत्यंतिक प्रवाही राहील. आजचा रविवार व्यावसायिक वसुलीचा. ता. ३ व ४ हे दिवस घरात सुवार्तांचे, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीचे.

भाग्यबीजं पेरणारा कालखंड

वृषभ : राशीतील अमावास्येचं फिल्ड रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील रुसव्या-फुगव्यांचं, शांत राहा. बाकी ता. २ ते ४ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मान-सन्मानाचा. मात्र, नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज टाळा. राजकारण नको. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी खरेदी करताना जपा.

नोकरीमध्ये आनंदोत्सव

मिथुन : सप्ताहात उधार-उसनवारी जपा. सट्टेबाजी टाळा. मित्रांशी वाद टाळा. बाकी सप्ताहाचा शेवट नोकरीत आनंदोत्सवाचा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून चर्चेत राहतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या काळातील प्रवासात जपावं, पैशांचं पाकीट जपा.

धनवर्षावाचा योग

कर्क : आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर खराब, नका काढू कुरापती. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या धनवर्षावाचा, व्यावसायिक वसुली. ता. ३ चा शुक्रवार मोठ्या दैवी प्रचितीचा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल, देवदर्शनं होतील.

थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ

सिंह : अमावास्येचं प्रभावक्षेत्र क्रिया-प्रतिक्रियांतून जपलंच पाहिजे. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ ते ४ हे दिवस शुभ ग्रहांच्या साथसंगतीचे. उत्तम व्यावसायिक उलाढाली. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी लाभ.

विशिष्ट स्पर्धांमध्ये यश लाभेल

कन्या : सप्ताहात स्त्रीवर्गाच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढू शकतात. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात होणारी मंगळ-गुरू युती संमिश्र फळं देईल. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ व ३ हे दिवस गाठीभेटी यशस्वी करणारे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक व्यवहार होतील.

नोकरीत ताण, भावंडांशी मतभेद

तूळ : अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवरील मंगळ-गुरू युतियोग हितशत्रुपीडेतून अस्वस्थ करू शकतो, भान ठेवा. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नव्या उपक्रमांचा शुभारंभ करून देईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या दंतव्यथेची. भावंडांशी मतभेद. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत ताण.

तरुणांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील

वृश्‍चिक : मंगळ-गुरू योगाचं एक पॅकेज अस्तित्वात राहील. सप्ताह नोकरीत भाग्योदयाचाच. सप्ताह तरुणांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाराच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ ते ४ हे दिवस वैयक्तिक हृद्य समारंभांचे. अमावास्येजवळ स्त्रीशी गैरसमज टाळा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी वेंधळेपणा टाळावा.

कलाकारांना मोठ्या संधी मिळतील

धनू : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींमध्ये आत्मविश्‍वास वाढवेल. कलाकारांना मोठ्या संधी प्राप्त होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ ते ३ हे दिवस शुभ घटनांतून फास्ट ट्रॅकचे. पूर्वाषाढा व्यक्तींना ता. २ चा गुरुवार गुरुप्रचितीचाच. घरात तरुणांची कार्यं ठरतील, काहींना मोठं स्पर्धात्मक यश. शनिवार विवाहयोगाचा.

आदर-सत्कार होतील

मकर : उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना छान बॅटिंग फिल्ड राहील, फक्त हातापायाच्या दुखापती सांभाळा. ता. ३ व ४ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या आदर-सत्कारांतून थक्क करतील. विवाहविषयक गाठीभेटींतून यश मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येजवळ खर्चाचे प्रसंग. वाहनपीडा.

महत्त्वाची कागदपत्रं सांभाळा

कुंभ : मंगळ-गुरू युतियोगाचं फिल्ड शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बौद्धिक उपक्रम यशस्वी करेल. कलाकारांना धनलाभ. सरकारी माध्यमांतून लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ जूनचा शुक्रवार मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातील व्रात्य लहान बालकं जपावीत.

सरकारी माध्यमांमधून लाभ होईल

मीन : अमावास्येजवळ वादग्रस्त गाठीभेटी टाळा. बाकी नंतर शुभ ग्रहांचंच फिल्ड क्रियाशील राहील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक मरगळ पूर्णपणे जाईल. सरकारी माध्यमांतून लाभ, पदस्थ व्यक्तींकडून लाभ. ता. २ ते ४ हे दिवस प्रचंड प्रवाही राहतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विवाहविषयक निर्णयाचा.

Previous Post

महाराष्ट्रातील ‘या ‘ सर्वसामान्यांचा सेवक असलेल्या मंत्र्याला लागली भूक ; पण कशाची ते पहा..!

Next Post

मिरजेत क्रिकेट बेटिंगमधून दोन गटात तुफान राडा : घरावर दगडफेक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

मिरजेत क्रिकेट बेटिंगमधून दोन गटात तुफान राडा : घरावर दगडफेक..

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group