• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापुरात मध्यरात्री घरावर दगडफेक , रातोरात झालेल्या हल्ल्याने खळबळ…

Admin by Admin
May 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : खबऱ्या प्रतिनिधी ; कोल्हापूरात पूर्व वैमनस्यातून एका घरावर दगडफेक करण्यात आली.

फुलेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आल. मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. याप्रकरणी हल्ल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. सुमारे पंधरा मिनिटं सलग दगडफेक केली जात होती. पोलिसांनी या दगडफेक प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून अधिक तपास केला जातो आहे. सध्या या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. मात्र रातोरात घरावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सीसीटीव्ही फुटेजही समोर

दगडफेकीच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. पंधरा मिनिटं दगडफेक सुरुच होती, असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमधून स्पष्ट झालंय. तिघांनी मिळून हा हल्ला केला होता. रस्त्यावर असलेले मोठमोठे दगड, घराच्या बाजूला असलेल्या दगडांची जमवाजमव करत तिघांनी घरावर दगड भिरकावले आहेत. या दगडफेकीच्या दरम्यान एक वाहनही रस्त्यावरुन जातं. मात्र कुणाचंच भय नसल्यासारखे तिघे जण घरावर एकामागून एक दगड भिरकावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलेत.

दगडफेकीत घराचं नुकसान

या दगडफेकीमध्ये घराचा दरवाजा, काचेच्या खिडक्या, घरातील सामान यांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र दगडफेक होत असल्याचं कळल्यानंतर घरातील सगळेच धास्तावले होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांत अखेर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय.

रातोरात झालेल्ला दगडफेकीच्या घटनेनं परिसरात दहशत पसरली आहे. नेमका हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला आणि का केला गेला? याची चौकशी सध्या पोलीस करत असून एका संशयिताला ताब्यातही घेण्यात आलंय.

Previous Post

“गडकरी पंतप्रधान असते तर ;” ठाकरे सरकारमधील नेत्याचे मोठं विधान, चर्चांना उधाण..!

Next Post

कर्जाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कर्जाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

कर्जाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group